सुट्टीच्या दिवशी नोंदणी मुद्रांक कार्यालय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 16:32 IST2018-03-28T16:32:57+5:302018-03-28T16:32:57+5:30

आर्थिक वर्षसंपण्यापूर्वी सर्व व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा येत्या २९ मार्च रोजी महावीर जयंती असून ३० मार्चला गुड फ्रायडे निमित्त शासकीय सुट्टी आहे.

registration stamp office is open On the holiday day | सुट्टीच्या दिवशी नोंदणी मुद्रांक कार्यालय सुरू

सुट्टीच्या दिवशी नोंदणी मुद्रांक कार्यालय सुरू

ठळक मुद्देराज्यात दरवर्षी एक एप्रिलपासून रेडी रेकनरचे दर (वार्षिक बाजार मूल्य ) लागू होतात. सलग दोन दिवस सुट्टी आल्याने ३१ मार्च रोजी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात व आॅनलाईन यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता

पुणे: राज्यात येत्या १ एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू होणार असल्याने नोंदणी व  कार्यालायत ३१ मार्च पूर्वी दस्त नोंदणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र,येत्या २९ व ३० मार्च रोजी सलग शासकीय सुट्टी आहे. परंतु, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने ३० मार्चला दस्त नोंदणीसाठी राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
राज्यात दरवर्षी एक एप्रिलपासून रेडी रेकनरचे दर (वार्षिक बाजार मूल्य ) लागू होतात. त्यामुळे आर्थिक वर्षसंपण्यापूर्वी सर्व व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा येत्या २९ मार्च रोजी महावीर जयंती असून ३० मार्चला गुड फ्रायडे निमित्त शासकीय सुट्टी आहे. सलग दोन दिवस सुट्टी आल्याने ३१ मार्च रोजी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात मोठी गर्दी होण्याची व आॅनलाईन यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने येत्या ३० मार्च रोजी राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत. 

Web Title: registration stamp office is open On the holiday day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे