जनकल्याण शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST2021-06-27T04:08:43+5:302021-06-27T04:08:43+5:30
केंद्र शासनाने जुलै २०२० मध्ये शेतकरी उत्पादक संस्था (Farmer Producer Organization) निर्मिती व संवर्धनासाठी एक योजना ...

जनकल्याण शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेची नोंदणी
केंद्र शासनाने जुलै २०२० मध्ये शेतकरी उत्पादक संस्था (Farmer Producer Organization) निर्मिती व संवर्धनासाठी एक योजना सुरु केली होती. लघु आणि सिमांत शेतकऱ्यांना विद्यमान संसाधनाची संधी मिळवून देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यासाठी कृषी क्षेत्राचे नुतनीकरण करण्याचा उद्देश यामागे होता. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात सर्वात प्रथम जुन्नर तालुक्यात जनकल्याण शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्या. १४ नंबर, कांदळी ता.जुन्नर जि.पुणे या संस्थेची नोंदणी युवा शेतकरी अनिल बापू भोर व मनोज फुलसुंदर यांच्या माध्यमातून करण्यात आली. सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर , संतोष भुजबळ, ई.डी.माळवे, अ.वि.यंदे, आप्पासाहेब धायगुडे, निलेश धोंगडे यांनी यासाठी सहकार्य केले.
पुणे जिल्ह्यातील पहिल्या जनकल्याण शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र शेतकऱ्यांना देताना सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर