आता २० सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी नोंदणी; सहा दिवसांची मुदतवाढ, सरासरी ४० टक्के नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 06:42 IST2025-09-14T06:40:47+5:302025-09-14T06:42:51+5:30

खरीप पिकांच्या नोंदणीसाठी शेतकरी स्तरावर एक ऑगस्ट ते १४ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. मात्र, ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची नोंदणी केलेली नव्हती.

Register for e-Peak Inspection now till September 20; Six-day extension, average 40 percent registration | आता २० सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी नोंदणी; सहा दिवसांची मुदतवाढ, सरासरी ४० टक्के नोंदणी

आता २० सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी नोंदणी; सहा दिवसांची मुदतवाढ, सरासरी ४० टक्के नोंदणी

पुणे : खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीकपाहणीची मुदत १४ सप्टेंबर असून अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करता आलेली नाही. काही ठिकाणी दुबार पेरणीही झाली आहे. त्यामुळे या ई-पीक पाहणीला सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत आता २० सप्टेंबर अशी करण्यात आली आहे. त्यानंतर सहायकांमार्फत नोंदणी केली जाणार आहे. राज्यातील एकूण पीक क्षेत्राच्या सुमारे ४० टक्के अर्थात ६७लाख १९ हजार हेक्टर झाली आहे, अशी माहिती ई-पीकपाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.

खरीप पिकांच्या नोंदणीसाठी शेतकरी स्तरावर एक ऑगस्ट ते १४ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. मात्र, ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची नोंदणी केलेली नव्हती.

६७१९६५२.४ हेक्टर नोंदणी

११६६९१०.४५

कोकण

१०५५९४०.४६

१९३४४२८.०१

नाशिक

अमरावती

नागपूर

संभाजीनगर

२०९३५३०.४८

पुणे

३६२७४३.५९

१०६०९९.४१

नोंदणी केलेले क्षेत्र ३९.७१%

दरम्यान राज्यात शनिवारपर्यंत (दि. १३) एकूण ६७लाख १९ हजार ६५२ हेक्टरवरील खरीप आणि बहुवर्षीय पिकांची नोंदणी झाली होती. त्यात ३० लाख हेक्टर सोयाबीन पिकाची नोंदणी झाली आहे. राज्यात २०१९ पूर्वी खरीपातील सरासरी पेरणी क्षेत्र १ कोटी ६९ लाख २२ हजार ९६७ हेक्टर इतके आहे. त्यानुसार नोंदणी केलेले क्षेत्र ३९.७१ टक्के आहे.

 

Web Title: Register for e-Peak Inspection now till September 20; Six-day extension, average 40 percent registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.