शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी पीएमआरडीएची क्षेत्रिय कार्यालये : किरण गित्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:36 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करुन घेण्यासंदर्भात मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ डिसेंबर २०१५ पुर्वी झालेली आतील बांधकामे १० टक्के शुल्क भरुन नियमित करता येणार आहेत.

ठळक मुद्देपीएमआरडीए हद्दीत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधीपीएमआरडीएला यामधून उपलबद्ध होईल चांगला निधी

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करुन घेण्यासंदर्भात मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ डिसेंबर २०१५ पुर्वी झालेली आतील बांधकामे १० टक्के शुल्क भरुन नियमित करता येणार आहेत. ही सुविधा आणखी सुलभ करण्यासाठी पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये क्षेत्रीय कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. संबंधित तहसील कार्यालयांसह मध्यवर्ती ठिकाणे सुरु करण्यात येणार असून सध्या पीएमआरडीएकडे दररोज चार ते पाच प्रस्ताव दाखल होत असल्याची माहिती महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. पीएमआरडीच्या हद्दीमध्ये ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही अनधिकृत बांधकामे पीएमआरडीएकडे अर्ज दाखल करुन अधिकृत करुन घेता येऊ शकणार आहेत. संबंधितांनी पीएमआरडीएकडे अर्ज दाखल करुन या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होत. त्यानंतर दररोज चार ते पाच प्रस्ताव पीएमआरडीएकडे येऊ लागले आहेत. बांधकामाच्या दहा टक्के दंड आकारुन ही बांधकामे नियमित करुन देण्यात येणार आहेत. दंडाच्या रकमेमधून पीएमआरडीएला मिळणारा निधी विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. पुणे जिल्ह्याच्या सीमा भागामध्ये मागील दहा बारा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहीली आहेत. शेकडो सदनिकांमध्ये लाखो नागरिक राहात आहेत. अनधिकृत बांधकामांचा मुद्दा वारंवार चर्चेमध्ये येत असतो. अनधिकृत बांधकामे पाडली जातात की काय अशी भितीची कायम टांगती तलवार रहिवाशांच्या डोक्यावर असते. त्यामुळे ही बांधकामे अधिकृत करण्याची मागणी नागरिकांमधून नेहमी केली जाते. पीएमआरडीएने ही अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या निर्णयानुसार ही बांधकामे नियमित करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. बांधकामांची संख्या लक्षात घेता नागरिकांना प्रस्ताव सादर करणे अधिक सोयीस्कर व्हावे याकरिता क्षेत्रीय कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. संबंधित तहसील कार्यालय आणि मध्यवर्ती ठिकाणी ही क्षेत्रीय सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना अनधिकृत बांधकामे सुरळीत करण्यासाठी जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. पीएमआरडीएला यामधून चांगला निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :PMRDAपीएमआरडीएPuneपुणे