शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांवरचे अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणार : प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 21:08 IST

सध्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासक्रमाचे मोठे ओझे आहे. २०१९- २० या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात काही बदल केले जातील.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा मेंदू म्हणजे डाटा बँक नाहीशारीरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, बुध्दीमत्तेला चालना देणारी नवीन शिक्षण पध्दती

पुणे: शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याबाबत केंद्र शासनाकडून हालचाली केल्या जात असून देशभरातील हजारो नागरिकांनी याबाबत केंद्राकडे सूचना पाठविल्या आहेत. त्यानुसार २०१९- २० या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात काही बदल केले जातील. शारीरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, बुध्दीमत्तेला चालणा देणारी आणि विचार करण्यास लावणारी नवीन शिक्षण पध्दती यापुढील काळात राबविली जाईल,असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सांगितले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पुण्यात साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. ते म्हणाले,विद्यार्थ्यांचा मेंदू म्हणजे डाटा बँक नाही. सध्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासक्रमाचे मोठे ओझे आहे. त्यातच मद्रास न्यायालयाने विद्यार्थ्यांची पुस्तकांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले आहे.पहिली व दुसरीला एक व दोन पुस्तके असावेत असे या आदेशात नमूद केले आहे.त्यामुळे २०१९ व २०२० मध्ये विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार टप्प्या-टप्प्याने कमी झालेला दिसेल.दहावी-बारावीमध्ये विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण मिळाले तरीही पालकांचे समाधान झाल्याचे दिसत नाही. केवळ परीक्षेत मिळालेले गुण म्हणजे शिक्षण नाही,असे नमूद करून जावडेकर म्हणाले, विद्यार्थ्यांकडे शारीरिक शिक्षणासाठी वेळ नाही. विद्यार्थ्यांना आपल्या भोवतालच्या गोष्टीतूनही शिक्षण घेता आले पाहिजे. त्यामुळे अध्यापन व अध्ययन याकडे लक्ष देवून विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे असलेले सर्जनशील कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. परंतु, नवीन शिक्षण पध्दतीमध्ये याचा अंतर्भाव केला जाईल.

टॅग्स :PuneपुणेPrakash Javadekarप्रकाश जावडेकरeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी