लठ्ठपणा कमी करायचा आहे? मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 05:45 PM2017-11-16T17:45:05+5:302017-11-16T17:50:51+5:30

लठ्ठपणाचे मी एक उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी ‘हे चित्र बदलण्यासाठी लहानवयातच मुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबच लठ्ठपणाविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवनशैलीत बदल करायला हवा’, असा कानमंत्र दिला.

Reduce obesity? Then listen to Chief Minister Devendra Fadnavis | लठ्ठपणा कमी करायचा आहे? मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐका...

लठ्ठपणा कमी करायचा आहे? मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐका...

Next
ठळक मुद्देमुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबच लठ्ठपणाविषयी प्रबोधन करणे आवश्यक : देवेंद्र फडणवीस‘लहान मुलांमधील लठ्ठपणाशी लढा’ मोहिमेचे उद्घाटन

पुणे : आपल्या जीवन आणि जीवनशैलीत परिवर्तन झाले आहे. तसेच सुखासीनपणा आल्याने लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी चिंता व्यक्त केली. लठ्ठपणाचे मी एक उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी ‘हे चित्र बदलण्यासाठी लहानवयातच मुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबच लठ्ठपणाविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवनशैलीत बदल करायला हवा’, असा कानमंत्रही दिला.
रोटरी क्लब आॅफ कोरेगाव पार्क आणि जेटी फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘लहान मुलांमधील लठ्ठपणाशी लढा’ या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मोहिमेच्या निमंत्रक आणि तोडकर क्लिनिक व जेटी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. जयश्री तोडकर, रोटरीचे जिल्हा प्रांतपाल अभय गाडगीळ, क्लबचे अध्यक्ष संदेश गुप्ता, नवनीत गाला आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहिमेचा लोगो व बीएमआय डायलरचे अनावरण करण्यात आले.
पुढील काळात देश घडविण्याची जबाबदारी असलेली पिढी नकळतपणे अक्षमतेकडे जात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. लठ्ठपणाबरोबरच त्यानंतर येणारे रोगही वाढत आहेत. जीवनशैली व जेवणशैली बदलली असून आता सुखासीनपणा आला आहे. मागील ४० वर्षांमध्ये आपल्या पारंपरिक शैलीत खुप बदल झाला आहे. शरीरासाठी आवश्यक पोषण आहाराचा समतोल बिघडला असून लहान मुले त्याला बळी पडत आहेत. लहान मुलांमधील मैदानी खेळाचे प्रमाण कमी झाले आहे. संगणकावरही मैदानी खेळ आल्याने तेच खेळले जात आहेत, ही शोकांतिका आहे. 
लठ्ठपणाचे मी एक उदाहरण आहे. त्यावेळी लठ्ठपणाविषयी अशा कोणत्याही मोहिमा नव्हत्या. आहारविषयी फारशी जागृती नव्हती. आता हे सगळे उपलब्ध होत आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना त्यांच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट, हे सांगण्याची गरज आहे. शाळांनी मुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबरच त्यांना लठ्ठपणाविषयी सांगणेही आवश्यक आहे. लठ्ठपणा हा सर्व रोगांची जननी आहे. त्यासाठी राज्यात कृती दलही स्थापन करण्यात आले आहे. आज पुण्यात सुरू झालेली मोहीम राज्यभर राबविण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमुद केले. मोहिमेची सुरूवात पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांपासून केली जाणार असल्याची माहिती डॉ. तोडकर यांनी यावेळी दिली.

Web Title: Reduce obesity? Then listen to Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.