शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेनटाईन डे’मुळे वाढली गुलाबाची लाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 19:33 IST

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’चे वेध प्रेमी युगलांना लागले आहे.

ठळक मुद्देआवक आणि दरामध्ये ४० टक्क्यांनी वाढ

पुणे : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’चे वेध प्रेमी युगलांना लागले आहे. त्यामुळे लाल गुलाबांना मागणी वाढली असून फुलांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत फुलांचे दर आणखी वाढण्याची शक्यता गुलाब व्यापा-यांनी व्यक्त केली. रविवार- सोमवारी घाऊक बाजारात फुलांच्या २० नगास १६० ते १८० रुपये दर मिळत असल्याची माहिती अखिल फूलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर आणि प्रसिध्दी प्रमुख सागर भोसले यांनी दिली.    ‘व्हॅलेनटाईन डे’ला प्रेमाच्या आणाभाका घेत गुलाब देण्याची प्रथा आहे. याबाबत वीर यांनी सांगितले, मावळ आणि शिरूर तालुक्यातून येथील मार्केट यार्डातील फुल बाजारात गुलाबांची जास्त आवक होत आहे. येथून राज्यात नागपूर, गुजरातमध्ये सुरत, बडोदा, मध्यप्रदेश येथील इंदौर, तेलगंणा येथील हैदराबाद, दिल्ली येथे फुलांची निर्यात होत आहे. व्हॅलेनटाईन डे ला आणखी चार दिवस असल्याने शेतक-यांनी माल राखून ठेवला आहे. येत्या दोन दिवसात आणखी आवक वाढेल. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील रविवारी गुलाबास १२० ते १४० रुपये दर मिळाला होता. तो आज वाढला आहे. गेल्या वर्षी साधारणपणे २०० रुपये दर मिळत होता.    सोशल मीडियाच्या जमान्यात इमेज तसेच व्हिडीओद्वारे प्रेम व्यक्त करण्याची प्रथा वाढते आहे. याचा फटका गुलाब शेतीला बसू लागला आहे. गुलाबाच्या मागणीत अपेक्षेइतकी वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे जास्त निगा राखावी लागत असलेल्या गुलाबाची लागवड कमी प्रमाणात केली जात आहे. सरासरीच्या तुलनेत ७० टक्केच लागवड केली जाते. भोसले म्हणाले, की पांढºया, पिवळ्या आणि इतर रंगाच्या फुलांनाही मागणी आहे. या फुलांना लाल गुलाबापेक्षा जास्त म्हणजे २० नगांना २०० रुपये दर मिळाले.

टॅग्स :PuneपुणेValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेrelationshipरिलेशनशिप