मोबाईलवर रेकॉर्डिंग, महिलेवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:33+5:302021-04-25T04:09:33+5:30
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांनी अर्जदार मोहिनी प्रदीप वायाळ (रा. ...

मोबाईलवर रेकॉर्डिंग, महिलेवर गुन्हा दाखल
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांनी अर्जदार मोहिनी प्रदीप वायाळ (रा. मंचर) व सचिन भालेराव यांना चौकशी कामी बोलवले होते. ठाणे अंमलदार कक्षात पोलीस कामकाज करत होते. त्या वेळी अर्जदार मोहिनी वायाळ हिने स्वतःकडील मोबाईल मधील चालू असलेल्या चर्चेचे रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली.हा प्रकार पोलीस उपनिरीक्षक अर्पणा जाधव यांच्या लक्षात आला असता त्यांनी रेकॉर्डिंग बंद करण्यास सांगितले.मात्र वायाळ हिने रेकॉर्डिंग बंद न करता चालू ठेवले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर जाधव यांनी सदर मोबाईल ताब्यात घेऊन त्याचा पासवर्ड विचारला. त्यावेळी कोणत्याही प्रकारची माहिती न देता मोहिनी वायाळ या पोलीस ठाण्यातून निघून गेल्या. तपास पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.