शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एकाच दिवसात अडीच लाख नागरिकांचे लसीकरण करत जिल्ह्याने मंगळवारी (दि.३१) राज्यात लसीकरणाचा स्वत:चाच कीर्तीमान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एकाच दिवसात अडीच लाख नागरिकांचे लसीकरण करत जिल्ह्याने मंगळवारी (दि.३१) राज्यात लसीकरणाचा स्वत:चाच कीर्तीमान मोडत नवा कीर्तीमान प्रस्थापित केला. बजाज समुहाने दिलेले दीड लाख डोस आणि शासनाकडे उपलब्ध असलेल्या लसी यातून राबविण्यात आलेल्या मेगा लसीकरण कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ५५९ लसीकरण केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था केली होती.

जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी खासगी कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून लस उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला बजाज समुहाने सकारात्मक प्रतिसाद देत दीड लाख कोविशिल्डच्या लस दिल्या. तर शासनाच्या ६० हजार लसींचे डोस यातून मंगळवारी (दि.३१) मेगा लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ग्रामीण भागातील ५५९ केंद्रावर दीड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर पुणे आणि पिंपरी मिळून दोन लाखापर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट प्रशासनाचे होते. मेगा लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा परिषदेने जंगी तयारी केली होती. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे तसेच सर्व सदस्यांनी, सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांनी जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री ९ वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. ग्रामीण भागात १३ तालुक्यात १ लाख ६८ हजार ५१२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर पुणे आणि पिंपरीत ६३ हजार ६७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात १ लाख ६७ हजार ९२ जणांनी पहिला डोस घेतला. तर ४५ हजार ३९९ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत मोजक्याच दिवशी लाखाहून अधिक लसीकरण झाले आहे. एप्रिल महिन्याच्या ५ तारखेला ८५ हजार १४६ जणांचे लसीकरण करण्यात आले होते. २६ जूनला १ लाख २९ हजार ९२३ लसीकरण झाले होते. २६ जूनला १ लाख १५ हजार ९४३, २८ जूनला १ लाख ४ हजार १४४, ३ जुलै १ लाख ४ हजार २४९, १० जुलैला १ लाख १९ हजार ७०६, १४ ऑगस्टला १ लाख ८३५ हजार, २१ ऑगस्टला १ लाख २ हजार २७४, तर २६ ऑगस्टला १ लाख १५ जणांचे लसीकरण झाले.

-

-

चौकट

कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी लसीकरण हाच सध्याचा एकमेव मार्ग आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. १ मार्चपासून सामान्य नागरिकांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. एप्रिल महिन्यात दोनदा, जून महिन्यात तीनदा, जुलै महिन्यात दोनदा, तर ऑगस्ट महिन्यात तीनदा एक लाखांहून अधिक लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला सध्या एका महिन्याला १०-१५ लाख लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे दररोज जास्तीत जास्त ५० हजार लसीकरण करणे शक्य होत आहेत. मंगळवारी एकाच दिवसांत अडीच लाख नागरिकांचे लसीकरण झाल्याने नवा कीर्तीमान पुणे जिल्ह्याने प्रस्तापित केला आहे.

कोट

जिल्ह्यात अडीच लाखांच्या आसपास लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचे एकाच दिवसांत झालेले हे सर्वाधिक लसीकरण आहे. लसींचा असाच पुरवठा झाला तर येत्या काही दिवसांतच उरलेल्या सर्वांचे लसीकरण करता येणार आहे. सामाजिकदायित्व निधीतून आणि शासनाकडून जास्तीत जास्त लस मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

कोट

मेगा लसीकरण मोहिमेसाठी बजाज कंपनीतर्फे आणि शासनाकडून मिळालेल्या लसींमधून मेगा लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी सर्व तालुक्यांना लाभार्थ्यांच्या हिशोबाने लस पुरवठा करण्यात आला. सकाळपासून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्रांनीही लसीकरणाचे चांगले नियोजन केल्याने जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण आज होऊ शकले.

-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी