रिक्षांच्या वयोमर्यादेवर पुनर्विचार व्हावा
By Admin | Updated: July 10, 2014 23:35 IST2014-07-10T23:35:11+5:302014-07-10T23:35:11+5:30
रिक्षांच्या सुरक्षिततेच्या क्षमतेची चाचणी परिवहन कार्यालय घेते; परंतु तरीही पुण्यातील 2क् वर्षापुढील रिक्षा बाद करण्याचा निर्णय परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे.

रिक्षांच्या वयोमर्यादेवर पुनर्विचार व्हावा
पुणो : रिक्षांना दर वर्षी तंदुरुस्ती प्रमाणपत्र घ्यावे लागते. रिक्षांच्या सुरक्षिततेच्या क्षमतेची चाचणी परिवहन कार्यालय घेते; परंतु तरीही पुण्यातील 2क् वर्षापुढील रिक्षा बाद करण्याचा निर्णय परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. तो रद्द करावा, ही रिक्षा पंचायतीने केलेली मागणी रास्त आहे. त्यामुळे रिक्षांच्या वयोमर्यादेविषयी पुनर्विचार करून परिवहन अधिका:यांनी प्राधिकरणा समोर प्रस्ताव ठेवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
रिक्षांना वयोमर्यादा न घालण्याच्या मागणीसह विविध मागण्यांकरिता रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिका:यांसोबत बैठक झाली. या वेळी पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, निमंत्रक नितीन पवार, सिद्धार्थ चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, एमएनजीएलचे व्यवस्थापक नावेद, मधुकर भुजबळ, शैलेश गाडे, गणोश वैराट, के. एन. घोरपडे आदी उपस्थ्त होते. सीएनजी पंपांबाबत येणा:या अडचणी तत्काळ दूर करण्याबाबत नावेद यांच्याकडून आढावा घेण्यात आला. (प्रतिनिधी)