शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

सायकल रॅलीतून पुण्याच्या जुन्या अाठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 17:49 IST

पुण्याच्या जुन्या अाठवणी पुन्हा एकदा जागवण्यासाठी अाठवणींचं पुणं...सायकलींचं पुणं या संकल्पनेवर अाधारित पुणे सायक्लाेथाॅन-2 चे अायाेजन करण्यात अाले अाहे.

पुणे : पुण्याला सायकलींचं शहर म्हणून अाेळखलं जात असे. बदलत्या काळात सायकलींची जागा अाता दुचाकी अाणि चारचाकींनी घेतली अाहे. पुण्याच्या जुन्या अाठवणी पुन्हा एकदा जागवण्यासाठी अाठवणींचं पुणं...सायकलींचं पुणं या संकल्पनेवर अाधारित पुणे सायक्लाेथाॅन-2 चे अायाेजन करण्यात अाले अाहे. लाेकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा याेजना विभाग अाणि स. प. महाविद्यालय यांच्या वतीने या सायक्लाेथाॅनचे अायाेजन करण्यात अाले अाहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून 7 अाॅक्टाेबर राेजी सकाळी 6.30 वाजता या सायक्लाेथाॅनला सुरुवात हाेणार अाहे.            स. प. महाविद्यालयाच्या आवारातून या सायक्लोथॉनला सुरुवात होणार आहे. या रॅलीमध्ये लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे व समीक्षा आमटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष शिल्पा तांबे व उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    प्रोफेशनल आणि हौशी सायकलिंग ग्रुप्स, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, पोस्टमन, सीए, डॉक्टर्स, व्यावसायिक व नोकरदार अशा सर्वच वर्गातील लोक या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत आहेत. यंदाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे पुण्यातील अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनीही सहभागाची तयारी दर्शवलेली आहे. ही सायकल रॅली २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा तीन प्रमुख मार्गांमध्ये विभागण्यात आली आहे. 

    'सायकलींचे पुणे' अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा सायकली धावाव्यात व पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान द्यावे, या उद्देशाने शहरातील प्रमुख शाळा-महाविद्यालयातून सर्वच विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. विशेष संदेश घेऊन येणारे ग्रुप्स, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, सर्वात छोटा सायकलस्वार अथवा सर्वात मोठा गट अश्या काही विशेष सहभागाचे कौतुक यावेळी केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना यामध्ये मोफत सहभागी होता येणार असून, इतरांसाठी रुपये १०० इतके देणगी शुल्क असणार आहे, असे शिल्पा तांबे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्याPune universityपुणे विद्यापीठS P Collegeस प महाविद्यालय