४ सप्टेंबरला वाचनवेड्यांचा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:30+5:302021-09-02T04:25:30+5:30
पुणे : वाचन वेडा पुस्तक भिशी या वाचन संस्कृती वाढवण्यास हातभार लावणाऱ्या उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त आळंदी देवाची येथे दि. ४ ...

४ सप्टेंबरला वाचनवेड्यांचा सोहळा
पुणे : वाचन वेडा पुस्तक भिशी या वाचन संस्कृती वाढवण्यास हातभार लावणाऱ्या उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त आळंदी देवाची येथे दि. ४ व ५ सप्टेंबर आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक शरद पोंक्षे, शरद तांदळे, डॉ. प्रकाश कोयडे, डॉ. नरेंद्र कदम, जयश्री बोडेकर, नवोदित लेखक अविनाश घोडके, चेतन बच्छाव, नीलम घाडगे, धनेश खंडारे व ॠचीत प्रकाशनाची टीम यात सहभागी होणार आहे.
पहिल्या दिवशी प्रसिद्ध कवी अनंत राऊत, प्रसिद्ध कवी गोपाळ मापारी, मनोज सूर्यवंशी व महेश होनमाने यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला वास्तुतज्ज्ञ कुमार दादा, अभिनेता विनम्र भाबल व व्याख्याते पार्थ बावस्कर उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन भिशी संचालिका रूपाली सोनावणे व व्यवस्थापकीय कमिटीतील प्रमुख सदस्य गणेश बनसोडे यांनी वाचनवेड्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
,----------------------------------------------