शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सॅलिसबरी पार्कच्या समस्यांना फुटणार वाचा लोकमत आपल्या दारी : मार्केटयार्डला कार्यक्रम

By admin | Updated: February 26, 2015 03:21 IST

डायस प्लॉट वसाहत, लुल्लानगर, पूनावाला पार्क, मीरा सोसायटी, डीएड कॉलनी व सॅलिसबरी पार्क भागातील रस्ते, वाहतूक, पाणी, आरोग्य,

पुणे : डायस प्लॉट वसाहत, लुल्लानगर, पूनावाला पार्क, मीरा सोसायटी, डीएड कॉलनी व सॅलिसबरी पार्क भागातील रस्ते, वाहतूक, पाणी, आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’चा कार्यक्रम गंगाधाम चौक येथील न्यूईरा सोसायटीच्या सभागृहात गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ४ ते ६ यावेळेत होणार आहे. त्यावेळी प्रभाग क्रमांक ६४ येथील विविध सार्वजनिक समस्यांविषयी स्थानिक नगरसेवक, महापालिका प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवाद करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. मार्केटयार्डच्या पूर्वेकडील डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, लुल्लानगर, भिमाले कॉम्पलेक्स, पूनावाला पार्क, मिठापल्ली ईस्टेट, मीरा सोसायटी, डीएड कॉलनी अशी प्रभागाची भौगोलिक रचना आहे. या प्रभागात २४ तास वाहनांची वर्दळ असते. प्रभाग क्रमांक ६४ येथील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’चे व्यासपीठ नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यावेळी स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले, नगरसेविका कविता वैरागे, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक निकम, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र साळूंके, वाहतूक पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने, बिबवेवाडी क्षेत्रीय अधिकारी सुनील गायकवाड यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना थेट संवाद साधण्याबरोबर लेखी स्वरुपातही समस्या मांडता येणार आहेत.