शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर वेळ घालविण्यापेक्षा पुस्तके वाचा : के. व्यंकटेशम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 13:58 IST

सोशल मीडियावर आपला किती वेळ जातो हे आपणच तपासायला हवे.

ठळक मुद्देकीप मुव्हिंग मुव्हमेंट उपक्रमांतर्गत व्याख्यानमाला

पुणे : सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक कुटुंबांमध्ये कीप मुव्हिंगपेक्षा कीप अर्निंग असे चित्र दिसत आहे. पूर्वीच्या काळी सर्व जण एकत्र कुटुंबामध्ये राहत. त्यामुळे चांगल्या-वाईट गोष्टींची समज घरातील मोठी माणसे देत असत. परंतु, सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीत चांगल्या वाईट गोष्टींची समज आपल्यालाच येणे आवश्यक आहे.  विद्यार्थीसोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. सोशल मीडियावर आपला किती वेळ जातो हे आपणच तपासायला हवे. चांगल्या लोकांशी संगत जोडा. सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा चांगली पुस्तके वाचा, असे मत पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.भावनिक कौशल्यांविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी लाईफ स्कूल फाऊंडेशनतर्फे कीप मुव्हिंग मुव्हमेंट उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. यावेळी लाईफ स्कूलचे संस्थापक नरेंद्र गोईदानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, व्याख्यानमालेचे समन्वयक प्रशांत शहा, ज्योती गोसावी आणि ७०० हून अधिक स्वयंसेवक उपस्थित होते. नरेंद्र गोईदानी म्हणाले, की प्रत्येक माणूस जोपर्यंत आनंदी राहत नाही, तोपर्यंत चांगले काम त्याच्याकडून होत नाही. तुम्ही आनंदी असाल तरच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील. आपले आयुष्य आपण कसे घडवायचे हे निवडण्याची संधी प्रत्येकाला मिळते. त्यामुळे आपणच आपल्यासाठी योग्य निवडले पाहिजे. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ती कशी बदलेल, यासाठी प्रयत्न करा. आपल्या आजूबाजूला असलेला मित्रवर्गदेखील चांगला निवडला पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे आपली प्रगती होईल. .........यशस्वी जीवन जगण्याची आवश्यक तत्त्वे १ या उपक्रमांतर्गत पुण्यातील महानगरपालिकेच्या विविध शाळेत ३ महिन्यांत ७ व्याख्याने घेतली जातात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, ध्येयवाद, प्रेरणा निर्माण व्हावी, यादृष्टीने त्यांना शिकविले जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल. २ यामध्ये भावनिक कौशल्ये रुजविण्याचे प्रयत्न केले जातात. मागील १८ वर्षांपासून ९ वी आणि १० वीतील मुलांना अभ्यासासोबतच यशस्वी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक तत्त्वे लाईफ स्कूल फाउंडेशनच्या कीप मुव्हिंग मुव्हमेंट या उपक्रमांतर्गत शिकविण्यात येतात. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना योग्य प्रकारे घडविणे हे शिक्षकांच्या आणि समाजाच्या हातात असते. 

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाStudentविद्यार्थी