शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयीपणाचा कळस गाठला! स्वत: च्याच मुलीवर ७ वर्षांपासून करत होता बलात्कार, नराधम बापाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 20:30 IST

शाळेच्या शिक्षिकांमुळे उघडकीस आला हा प्रकार

ठळक मुद्देआपल्यावरील हा अत्याचार ही मुलगी असह्यपणे करत होती सहन

पुणे : आपल्याच अल्पवयीन मुलीवर तो गेल्या ७ वर्षांपासून बलात्कार करीत होता. वडिलच नराधम ठरल्याने बुजलेल्या या १३ वर्षाच्या मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती आपल्या शाळेतील शिक्षिकांना दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

कोंढवा पोलिसांनी या किराणा दुकानदार वडिलांना अटक केली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, या मुलीच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. तो गेली ७ वर्षे आपल्याच मुलीवर अत्याचार करीत होता. सध्या शाळा बंद असल्याने मुलगी घरीच असते. आपल्यावरील हा अत्याचार ही मुलगी असह्यपणे सहन करत होती.

शेवटी तिने आपल्या ऑनलाईन शिकविणार्या शाळेच्या शिक्षिकेला आप बिती कहानी सांगितली. त्यांनी याकडे गंभीरपणे पहात थेट कोंढवा पोलीस ठाणे गाठले. कोंढवा पोलिसांनी तातडीने या शिक्षिकेची फिर्याद घेतली. त्यावरुन पोलिसांनी ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन मुलीच्या वडिलांना अटक केली. 

पुण्यात मागील आठवड्यात पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि खडकी लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार झाला होता 

पुण्यात ६ सप्टेंबरलाही लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. मित्राला भेटण्यासाठी मुंबई जात असलेल्या १४ वर्षाच्या मुलीला पुणे रेल्वे स्टेशनहून घरी सोडण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकाने अपहरण करुन आपल्या मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.  पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला.

खेड तालुक्यातही १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती 

खेड तालुक्यात पश्चिम भागातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली होती. तीन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली असून तीन फरार झाल्याचे समोर आले होते. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला