शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

रयत क्रांती संघटना विधानसभेसाठी घेणार ताकदीचा अंदाज : सदाभाऊ खोत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 11:31 IST

आमची संघटना कमळ चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट खोत यांनी केले. 

ठळक मुद्देबिबवेवाडी येथे रयतच्या राज्य कार्यकारिणीची बैठक : समिती करणार जिल्हानिहाय दौरा शेतकरी धोरण, दुष्काळ, पीक कर्जे याबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा दुष्काळी स्थिती ही संधी मानून शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी तज्ज्ञांची कार्यशाळा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ताकदीचा अंदाज घेण्यासाठी रयत क्रांती संघटनेची समिती येत्या दीड महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या भागात दौरे करुन संबंधित तालुक्यात मेळावे घेण्यात येतील. त्यानंतर संबंधित जागांची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. आमची संघटना कमळ चिन्हावरच निवडणूक लढविणार असून, महायुतीच्या जागावाटपात मिळेल त्या जागेवर माझी लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रयतच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवारी बिबवेवाडी येथे झाली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, कृषी मूल्य आयोगाचे सदस्य सुहास पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील, सागर खोत या वेळी उपस्थित होते. शेतकरी धोरण, दुष्काळ, पीक कर्जे याबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच, शेतकरी प्रश्नांवर संघटनेची भूमिका देखील यावेळी ठरविण्यात आली. खोत म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा जणांची समिती तयार करण्यात आली आहे. येत्या दीड महिन्यात ही समिती जिल्हा आणि तालुक्यांचा दौरा करेल. तसेच, निवडणुक लढण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींची देखील भेट घेतली जाईल. त्या नंतर ज्या जागा ताकदीने लढवू शकतो, त्याचा अहवाल समिती जाहीर करेल. त्यानंतर इच्छुकांचे राज्यव्यापी आंदोलन घेतले जाईल. आचारसंहितेपुर्वी संघटना लढवू इच्छित असलेल्या जागा जाहीर कले. तसेच, महायुतीशी देखील चर्चा केली जाईल.  राज्याला वारंवार दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतो. यंदाची दुष्काळी स्थिती ही संधी मानून शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी तज्ज्ञांची कार्यशाळा घेण्यात येईल. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला अहवाल दिला जाईल. पीक विम्याची रचना मंडल निहाय न धरता गाव पातळीवर करावी, दुष्काळी स्थितीमुळे विद्युत पंपांचे बिल माफ करावे, शेतीसाठी शेतजमीन मूल्यांकनाच्या ५० टक्के कर्जे द्यावी, सूक्ष्म सिंचनाचे अनुदान पन्नासवरुन ८० टक्के करावे, दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे असा ठराव संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. --------------------------

शेती विरोधी धोरणे बदला : खोतआयात-निर्यात धोरण, शेतमालावर असलेली निर्बंध अशी सरकारची अनेक धोरणे शेती विरोधी आहेत. आयात निर्यात धोरण कार्यक्रम ५ वर्षे कालावधीसाठी असावा, स्थानिक बाजारपेठ शेतकऱ्याला मुक्त असावी अशी संघटनेची भूमिका असून, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSadabhau Khotसदाभाउ खोत Farmerशेतकरीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपा