शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अटक भोवली ...! रवींद्र मराठे आणि गुप्ता यांचे सर्व अधिकार काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 20:01 IST

रवींद्र मराठे आणि गुप्ता दोघेही यापुढे बँकेत कार्यरत राहिले तरी त्यांना कोणत्याही स्वरूपाचे कार्यकारी अधिकार असणार नाहीत, असे बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे.

ठळक मुद्देबँक आॅफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाचा निर्णय: दोघांनाही अटक भोवलीअटक आरोपींकडून पोलिसांनी विविध कागदपत्रे जप्त करून याप्रकरणाचा तपासशिवाजीनगर येथे झालेल्या या बैठकीबद्दल मोठ्या प्रमाणात गुप्तता पोलीस कोठडीत राहिल्याचे मुख्य कारण 

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी (डीएसके) यांना कर्ज देताना नियमांना बगल दिल्याच्या आरोपावरून झालेली अटक बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना चांगलीच भोवली आहे. दोघांचेही सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय शुक्रवारी बँकेच्या शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बॅँकेचे कार्यकारी संचालक ए.सी. राऊत यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.     मराठे आणि गुप्ता दोघेही यापुढे बँकेत कार्यरत राहिले तरी त्यांना कोणत्याही स्वरूपाचे कार्यकारी अधिकार असणार नाहीत, असे बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे. मराठे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशानुसार बॅँकेच्या संचालक मंडळाची तातडीने बैठक घेण्यात आली. दिल्लीहून केंद्र सरकारचे दोन प्रतिनिधी पुण्यात दाखल झाले होते. त्यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत मराठे व गुप्ता यांच्या अधिकारांबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर संचालक मंडलाने दोघांचेही सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. बॅँकेचे कंपनी सेक्रेटरी चंद्रकांत भागवत यांनी याबाबत मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला पत्राद्वारे कळविले आहे. बॅँकेचे कामकाज सुरळित चालण्यासाठी अर्थ मंत्रालयानेही आवश्यक तरतुदी कराव्यात, अशी विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे.      डीएसके यांच्या डीएसकेडीएल या कंपनीला कर्ज देताना रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे (आरबीआय) नियम पाळले नाही. तसेच इतर अनेक बेकायदेशीर बाबी करून कर्ज वितरीत केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मराठे व गुप्ता यांच्यासह बँकेचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत व तत्कालीन विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना अटक केली होती. त्याचवेळी डीएसके यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे व डीएसके समूहातील एका कंपनीच्या उपाध्यक्षालाही अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत अस्वस्थ वाटू लागल्याने मराठे यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. अटक आरोपींकडून पोलिसांनी विविध कागदपत्रे जप्त करून याप्रकरणाचा तपास केला आहे. .................बैठकीबाबत गुप्तता शिवाजीनगर येथे झालेल्या या बैठकीबद्दल मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आली होती. बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनाही या बैठकीबाबत माहिती देण्यात आली नव्हती. अचानक झालेल्या बैठकीमुळे आणि मराठे व गुप्ता यांच्याबाबत झालेल्या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ खळबळ उडाली. ......................................................पोलीस कोठडीत राहिल्याचे मुख्य कारण सरकारी नोकरी करीत असलेला कर्मचारी कोणत्याही गुन्ह्यात अटक होऊन दोन दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यास त्याचे निलंबन होत असते. या कायद्यानुसारच मराठे व गुप्ता यांच्याबाबतीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. चौकशीनंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्याची देखील तरतूद आहे. दोघेही सात दिवस पोलीस कोठडीत होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. .........................गुप्तांचे व्यवस्थापकीय संचालक होण्याचे स्वप्न भंगणार ?न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुप्ता यांना शुक्रवारी जामीन देण्यात आला. येत्या काही दिवसांत बँक आॅफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकीय संचालक पदासाठी आरबीआय मुलाखती घेणार आहे. या मुलाखतींसाठी गुप्ता यांना देखील बोलविण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र, आता अधिकार काढून घेतल्याने गुप्ता यांना मुलाखतीसाठी बोलविले जाणार का? तसेच त्यांचे व्यवस्थापकीय संचालक पदाचे स्वप्न पूर्ण होणार की भंगणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीPoliceपोलिस