विद्युत वितरण समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST2021-07-09T04:08:11+5:302021-07-09T04:08:11+5:30

बारामती तालुका विद्युत वितरण समितीपदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार ...

Ravindra Mane as the Chairman of Power Distribution Committee | विद्युत वितरण समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र माने

विद्युत वितरण समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र माने

बारामती तालुका विद्युत वितरण समितीपदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार अध्यक्षांव्यतिरिक्त इतर सहा अशासकीय सदस्य निवडण्यात आले आहेत. अध्यक्षपदी खांडज येथील अ‍ॅड. रवींद्र बाबूराव माने यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता, तहसीलदार, सभापती, नगराध्यक्ष आदी अकरा सदस्य आहेत. वीज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मोरगावचे विद्यमान सरपंच नीलेश केदारी यांची सदस्यपदी, तर उद्योगक्षेत्र ग्राहकमध्ये केलेल्या कार्याबद्दल संजय प्रभाकर दुधाळ, कृषी क्षेत्र ग्राहकमध्ये कार्याबद्दल वैभव रघुनाथ बुरुंगले, व्यावसायिक ग्राहक कार्याबद्दल विश्वास मल्हारी मांढरे, घरगुती ग्राहक कार्याबद्दल विश्वास तानाजी आटोळे, वीज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल सुनील जयसिंग खलाटे यांची निवड करण्यात आली आहे.

नीलेश केदारी

०८०७२०२१-बारामती-०४

Web Title: Ravindra Mane as the Chairman of Power Distribution Committee