शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

धंगेकरांची पश्चातबुद्धी :  पक्षात प्रवेश केला असता तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 2:08 PM

काँग्रेसने दिली धोबीपछाड...

ठळक मुद्देधंगेकर सलग चार वेळा नगरसेवक म्हणून रविवार पेठ व त्या परिसरातील प्रभागातून निवडून आलेदोन वेळा शिवसेना एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आता काँग्रेस असा त्यांचा प्रवास

पुणे : काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी बुधवारी सकाळी समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. अपक्ष म्हणून ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. काँग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून राहण्याऐवजी थेट पक्षात प्रवेश केला असता तर चित्र कदाचित वेगळे असते, असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून निघतो आहे. धंगेकर सलग चार वेळा नगरसेवक म्हणून रविवार पेठ व त्या परिसरातील प्रभागातून निवडून आले आहेत. दोन वेळा शिवसेना एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आता काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. पालिका निवडणुकीच्या आधी त्यांनी मनसेचा त्याग केला. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश न करता त्यांनी सहयोगी सदस्य म्हणून राहणे पसंत केले. काँग्रेसनेही त्यांना पुरस्कृत केले. भाजपच्या गणेश बीडकर यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर त्यांनी रितसर काँग्रेसमध्ये प्रवेश करायला हवा होता, असे त्यांच्याच काही समर्थकांचे तसेच काँग्रेसच्याही काही पदाधिकाºयांचे म्हणणे आहे. पक्षाचे सहयोगी सदस्य म्हणून पालिकेतील त्यांचे वर्तन स्वतंत्रच राहिले. पक्षाला फायदा होण्याऐेवजी काही वेळा पक्ष अडचणीत आला. त्याचाच फटका त्यांच्या उमेदवारीला बसला असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमधील काही सूत्रांनी सांगितले, की धंगेकर यांचे नाव आघाडीवर होते; मात्र ऐनवेळी ते पक्षाचे सहयोगी सदस्य असल्याचे व त्यांचा काही भरोसा नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यामुळे शिंदे यांचे नाव पुढे आले व उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली. शिंदे पुणे रेल्वे स्थानक परिसरातील रहिवासी आहेत. गेली अनेक वर्षे ते त्याच प्रभागातून निवडून येत आहेत. सुरुवातीपासून काँग्रेसमध्येच आहेत.  मात्र ते कसबा विधानसभा मतदारसंघातील रहिवासी नाहीत, त्यांचे कार्यक्षेत्र कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आहे. मात्र तिथून पक्षाचे शहराध्यक्ष असलेले रमेश बागवेच उमेदवार असल्यामुळे शिंदे यांची अडचण झाली असावी. तरीही कसबा विधानसभा मतदारसंघाचा आग्रह त्यांनी पक्षाकडे का धरला हे गूढच आहे. धंगेकर यांच्या पवित्र्यामुळे त्यांची अडचणच झाली आहे. ..........कसबा विधानसभेवर कायम डोळा कसबा विधानसभेवर त्यांनी कायम डोळा ठेवला. नगरसेवकपदाचा वापर त्यांनी त्यासाठीच केला. पालिका निवडणुकीपासूनच त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. सोसायट्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग विनामूल्य करून देण्यापासून ते कोणत्याही तक्रारीच्या निवारणासाठी २४ तास उपलब्ध होण्यापर्यंतचे प्रयत्न त्यांनी केले, मात्र काँग्रेसने त्याची दखल घेतलेली दिसत नाही

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक