शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

अजूनही उंदीर फिरताहेत; औषध फवारणी अपूर्ण, यशवंतराव नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने नक्की काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:13 IST

नाट्यगृहात दररोज साफसफाई केली जात असली तरी आतील काही भागात उंदरांचा वावर अद्यापही दिसून येत असल्याची तक्रार काही कलाकारांनी केली आहे

कोथरूड : कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गेल्या काही दिवसांत स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टीने त्रुटी जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी एका नाट्यप्रदर्शनादरम्यान एका महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदीर शिरल्याची घटना घडल्याने प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर महापालिकेकडून स्वच्छतेच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नाट्यगृहात दररोज साफसफाई केली जात असली तरी आतील काही भागात उंदरांचा वावर अद्यापही दिसून येत असल्याची तक्रार काही कलाकारांनी केली आहे. स्टेजखालचा भाग व मागील गोडाऊनमध्ये कीटकनाशक फवारणी अपुरी असल्याचेही बोलले जात आहे.

सुरक्षेच्या बाबतीत नाट्यगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असले, तरी काही कॅमेरे नादुरुस्त स्थितीत आहेत. येथील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. खालील कोपऱ्याच्या ठिकाणी गुटखा खाऊन, थुंकल्याचा प्रकार समोर आला आहे. पिण्याच्या पाण्याचे झाकण देखील तुटल्याच्या अवस्थेत आहेत. 900 ते 1000 प्रेक्षक, श्रुती येथे बसतील, अशी व्यवस्था या सभागृहात आहे. मात्र या ठिकाणी काही मोजकेच सुरक्षारक्षक आहेत. उंदीर प्रकरणामुळे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने निरीक्षण वाढवले असून, स्वच्छता व सुरक्षा उपाययोजना राबविण्यासाठी मनपाचे अधिकारी दुरुस्ती व स्वच्छता करतानाचे या ठिकाणी दिसून आले.

कोथरूड भागातील यशवंतराव चव्हाण हे नाट्यगृह नामांकित आहे. काही दिवसांपूर्वी उंदराचा शिरकाव झाल्याने येथील प्रेक्षकांना त्याचा सामना करावा लागला. परंतु बाहेरील व कॅन्टीनचे खाद्यपदार्थ नाट्यगृहात येथेच कसे याची तपासणी वेळोवेळी केली पाहिजे. येथे श्रुती प्रेक्षक तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक नाटक व कार्यक्रमासाठी येत असतात. त्यांना असे समस्येचा सामना करावा लागतो हे निंदनीय आहे. पिक्चरच्या व पुणे शहरातील मोठ्या मोठ्या थेटरमध्ये अशा घडत नाहीत, त्या इथेच का घडतात?- एक मॅजिशियन कलाकार

कोथरूड हे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. परंतु अशा नामांकित असलेले यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे विविध कार्यक्रम घेतले जातात अक्षरशः या ठिकाणी कार्यक्रमाची तारीख भेटण्यासाठी वाट बघावी लागते. खूप सुंदर आणि छान नाट्यगृह आहे आमच्या लहान चिमुकल्याचा कार्यक्रम असल्यामुळे मी बाल नाट्य बघण्यासाठी आले होते. स्वच्छता तसेच बसण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. परंतु उंदीर आले कसे हे व्यवस्थापन तसेच मॅनेजमेंटने बघणे महत्त्वाचे ठरत आहे.- युगंधरा साळुंके, पुणे

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेचा निषेध करून आम्ही आंदोलन केले. यावेळी येथील व्यवस्थापनाला उंदीर पकडायचे पिंजरे भेट देण्यात आले आहेत. नंतरच्या कालावधीत असा प्रकार आढळून आल्यास युवकच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.- गिरीश गुरनानी- युवक अध्यक्ष कोथरूड

आम्ही पुण्यातील विविध नाट्यगृहात स्वच्छतेची कामे करतो. मात्र त्या ठिकाणी देखील उंदराचे प्रमाण असते आपल्या स्वतःच्या घरात देखील उंदीर आढळून येतात. या ठिकाणच्या काही भागातील खाद्य आतमध्ये घेऊन आलेल्या नागरिकांच्या वतीने ते खाद्य खाली सांडल्यामुळे ही घटना घडली असावी. उंदीर साडीत शिरल्यामुळे ही घटनेमुळे आम्हाला येथे स्वच्छतेसाठी आणण्यात आले आहे.- एक साफसफाई कर्मचारी महिला

महात्मा फुले सांस्कृतिक भवनातील दरवाजे, कडी कोयंडे, खुर्च्यांची दुरवस्था

वानवडीतील प्रशस्त असे महात्मा फुले सांस्कृतिक भवन हे मागील दोन वर्षांपासून देखभाल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. नाटकांअभावी कलाकारांच्या राहण्यासाठी असलेल्या खोल्या धूळखात पडून आहेत, तसेच या खोल्यांमधील शौचालयात भांडी, नळ, पाणी नाही. याठिकाणी तुटलेले दरवाजे कडी कोयंडे, आसन व्यवस्थेमधील खुर्च्या तुटलेल्या-फाटलेल्या अवस्थेत आहेत. विद्युत व्यवस्थेमध्ये बिघाड आहे. स्टेजवर सोडल्या जाणाऱ्या लाईट बंद आहेत. पिण्यासाठी पाणी याठिकाणी नाही. सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था आहे. परंतु पार्किंगमध्ये पुरेशी लाईट नाही. बाहेरील वाहने या ठिकाणी महिनोंमहिने लावलेली आहेत. महात्मा फुले सांस्कृतिक भवन स्वच्छतेविषयी निविदा निघाल्या नाहीत. परंतु याठिकाणी ठेकेदाराचे चार स्वच्छता कर्मचारी सफाईचे व चार सुरक्षारक्षक काम करत आहेत. टवाळखोरच भिंतीवरून उड्या मारून मागच्या बाजूने आत येतात व मद्यप्राशन करत असतात. सुरक्षारक्षकांनी हटकल्यास त्यांच्यावरच अरेरावी केली जाते. निविदा निघाली नसल्याने याठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे रखडली असल्याचे येथील व्यवस्थापकांनी सांगितले.

पुण्यातील नाट्यगृहात नाट्य कमी; पण महापालिकेची ‘नाटकं’ जास्त!

 सांस्कृतिक राजधानी असल्याने पुणे महापालिकेने काेट्यवधी रुपये खर्चून भव्य नाट्यगृहं उभारली... जी दुरून दिसतातही आकर्षक अन् भव्य; पण आत गेल्यावर कळतं की, ते किती पाेकळ आहे... ‘बडा घर, पाेकळ वासा’ या म्हणीचा प्रत्यय येथे येताे. कारण, खुर्च्या आहेत पण त्यांची अवस्था वाईट आहे... वातानुकूलित यंत्रणा आहे, पण तीही नावालाच... वाहनतळ आहे; पण तेही ठेकेदारांनी खासगी गाड्या पार्क करून अडवून ठेवले आहेत... कर्मचारी आहेत तेही नामधारी... त्यामुळे स्वच्छता, सुरक्षितता आणि सुसज्जत: शाेधावी लागते. परिणामी नाटकांच्या प्रयोगाऐवजी येथे उंदीर, मांजर, घुस, साप, झुरळं, डास यांचाच खेळ सुरू असताे. याचे मुख्य कारण महापालिकेची उदासीनता असून, प्रशासनाला जाग येणार कधी, असा प्रश्न नाट्यकलावंतांसह प्रेक्षक करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNatakनाटकartकलाHealthआरोग्य