शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर भागवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:52 IST

येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते..

ठळक मुद्दे‘हापूस’ सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचरत्नागिरी हापूसचे दर ५०० ते ७०० रुपये डझन, कर्नाटक तयार हापूस ३०० ते ५०० रुपये डझन

पुणे: अक्षयतृतीच्या मुहूर्तावर रविवारी (दि.५) गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ विभागामध्ये पुणेकरांनी आंबा खरेदीसाठी गर्दी केली. परंतु रत्नागिरी हापूसचे दर अद्यापही सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्याबाहेरच असल्याने पुणेकरांनी ‘रत्नागिरी’ ची चव ‘कर्नाटक’ वर भागवली आहे. कर्नाटक तयार हापूस ३०० ते ५०० रुपये डझनने मिळत असून, रत्नागिरी हापूसचे दर ५०० ते ७०० रुपये डझन असल्याचे रत्नागिरी हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.      येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. अक्षयतृतीयाला आंब्याची मागणी वाढत असल्याने आंब्याचे दर देखील वाढतात. परंतु यंदा सुरुवातीपासूनच रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे दर अधिकच आहेत. अद्यापही हे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरच आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मार्केट यार्डामध्ये आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे. परंतु यामध्ये रत्नागिरी तयार हापूस मात्र मागणीच्या तुलनेत कमी आहे. यामुळे कच्च्या आंब्याची आवक वाढून देखील हापूसचे दर मात्र कमी झाले नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले. रविवार (दि.५) रोजी रत्नागिरी हापूस कच्च्या आंब्याची सुमारे १० ते १२ हजार पेट्या आवक झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून ही आवक कायम असली तरी तयार आंबा तुलनेत कमी आहे. यामुळे होलसेल मार्केटमध्ये रत्नागिरी तयार हापूसच्या ४ ते ८ डझनचे दर १५००-३००० रुपये ऐवढे दर मिळत आहे.     दरम्यान अक्षयतृतीयाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक हापूस आंब्याच्या तब्बल १८ हजार ते २० हजार पेट्यांची आवक झाली. गेल्या तीन-चार दिवसांत ही आवक २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरामध्ये देखील २० ते २५ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारामध्ये प्रतवारीनुसार कर्नाटक हापूस आंबा २५० ते ५०० रुपये डझन पर्यंत मिळत आहे. रविवारी मार्केट यार्डात कर्नाटक हापूस कच्चा ४ ते ५ डझनमागे ५०० ते १००० रुपये दर मिळाला असल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.-------------------आंब्याचे दर रत्नागिरी हापूस (कच्चा) :  ४-८ डझन १२०० ते २८०० रुपयेरत्नागिरी हापूस (तयार) : ४-८ डझन १५०० ते ३००० रुपयेकर्नाटक हापूस (कच्चा) : ४-५ डझन ५०० ते १००० रुपयेकर्नाटक हापूस (तयार) : ४ -५ डझन  १२०० ते १५०० रुपयेपायरी : ४ डझन ४०० ते ८०० रुपयेलालबाग : २० ते ३०  रुपये किलोबदाम : ३० ते ४० रुपये किलोतोतापूरी : २० ते ३५ रुपये किलोमलिका : ३५ ते ४५ रुपये किलो---------------------------रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्रीअक्षयतृतीच्या पार्श्वभूमीवर आंब्याची मागणी वाढल्याने सध्या शहरामध्ये रस्त्या-रस्त्यावर , गल्ली-बोळांमध्ये आंब्याची विक्री सुरु आहे. परंतु या किरकोळ विक्रेत्यांकडून रत्नागिरी हापूस असल्याचे सांगून कर्नाटक हापूसची विक्री केली जात आहे. रत्नागिरी आणि कर्नाटक हापूस दिसायला सारखेच  असल्याने व्यापा-यांकडून फायदा घेतला जात आहे. परंतु दोन्ही आंब्याच्या चवीमध्ये खूपच फरक आहे.  रत्नागिरी आंबा अधिक मधुर असतो. त्यातुलनेत कर्नाटक हापूसची चव नसते.

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाAkshaya Tritiyaअक्षय तृतीयाRatnagiriरत्नागिरीKarnatakकर्नाटक