शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी हापूसची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 19:43 IST

मार्केट यार्डात रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातून हापूस आंब्याच्या सुमारे १० हजार पेट्यांची आवक झाली.

ठळक मुद्दे कर्नाटक हापूसची आवकही काही प्रमाणात वाढ

पुणे: ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या रत्नागिरी हापूसची आवक दिवसेंदिवस वाढत चालेली असून रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात तब्बल दहा हजार पेट्यांची आवक झाली. बाजारात चांगल्या प्रतीचा आंबा दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच आता कर्नाटक हापूसची आवकही काही प्रमाणात वाढ आहे. परिणामी रत्नागिरी हापूसच्या दरात घट होत आहे.त्यामुळे पुढील दोन आठवड्यात आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल,असा अंदाज मार्केट यार्डातील फळव्यापा-यांकडून वर्तविला जात आहे.रत्नागिरी हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, रविवारी मार्केट यार्डात रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातून हापूस आंब्याच्या सुमारे १० हजार पेट्यांची आवक झाली.मार्केट यार्डात रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातून हापूस आंब्याच्या सुमारे १० हजार पेट्यांची आवक झाली. घाऊक बाजारात कच्चा हापूस आंब्याच्या ४ ते ८ डझनाच्या एका पेटीस १५०० ते ३५०० रुपये भाव मिळाला. तर, तयार आंब्याच्या ४ ते ८ डझनच्या पेटीस २००० ते ४००० रुपये दर मिळाला. सुरूवातीला रत्नागिरी हापूस आंब्याची केवळ १०० ते २०० पेट्यांची आवक होत होती. आता आवक वाढली असून सध्या बाजारात चांगल्या दर्जाचे आंबे दाखल होत आहेत. आता आवक वाढली असून  सध्या बाजारात चांगल्या दर्जाचे आंबे दाखल होत आहेत.दरम्यान,लालबाग, बदाम, पायरीची ५ टन इतकी आवक झाली. लालबागला (कच्चा) प्रतिकिलोस ५० ते ७० रुपये, बदामला ६० ते ८० रुपये, पायरीला ८० ते १०० रुपये किलो असा दर मिळाला,असे आंब्याच्या व्यापा-यांनी सांगितले.-----------------------कर्नाटक हापूसची आवक वाढलीकर्नाटकातील हापूस आंब्यावर हवामान बदलाचा परिणाम झाला आहे.त्यामुळे कर्नाटक हापूसची आवक कमी होत होती.मात्र,रविवारी बाजारात कर्नाटक हापूस आंब्याच्या सुमारे साडेतीन हजार पेट्या इतकी आवक झाली. कर्नाटक हापूसच्या (कच्चा)  ३ ते ५ डझनाच्या एका पेटीस १००० ते १६०० तर तयार कर्नाटक हापूसच्या एका पेटीस १५०० ते २००० रुपये भाव मिळाला,असे कर्नाटक हापूस आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांंनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेfruitsफळेMarket Yardमार्केट यार्ड