शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

सलोखा जपण्याऐवजी भडकावल्या भावना

By admin | Updated: July 9, 2015 03:11 IST

किरकोळ कारणावरून पर्वती दर्शन येथे झालेल्या दंगलीला तत्कालिक कारण पुरेसे ठरले असले, तरीदेखील याला काही दिवसांपासूनची खदखद कारणीभूत ठरली आहे.

पुणे : किरकोळ कारणावरून पर्वती दर्शन येथे झालेल्या दंगलीला तत्कालिक कारण पुरेसे ठरले असले, तरीदेखील याला काही दिवसांपासूनची खदखद कारणीभूत ठरली आहे. दंगल उसळल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या परिने सामाजिक सौहार्द टिकविण्याचा प्रयत्न केला; परंतु घटनास्थळाला भेट दिलेल्या लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाऱ्यांनी मात्र धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून भावना भडकवणारी वक्तव्ये केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांना मात्र हातचे काम सोडून, या राजकीय कार्यकर्त्यांचीच समज काढण्याची वेळ आली आहे.मशिदीमध्ये नमाजला जात असताना मंडळासमोर दुचाकी लावताना डोळ्यांवर हेडलाइटचा प्रकाश पडला म्हणून वादावादीला सुरुवात झाली. या किरकोळ कारणाचे पर्यवसान दंगलीमध्ये झाले. यामध्ये दोन्ही बाजूंचे १२ जण जखमी झाले. पोलिसांनी उपलब्ध मनुष्यबळामध्ये प्रयत्नपूर्वक ही दंगल नियंत्रणात आणली. तीनच दिवसांपूर्वी या भागात पोलिसांच्या सहकार्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. शहरातही विविध भागांमध्ये रोजा इफ्तार सुरू आहेतच. गणेशोत्सव, नवरात्र, ईद, रमजान, नाताळ, दिवाळी काहीही असले, तरी सामाजिक सलोखा टिकवण्याची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडते. त्याला राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत नाही. कायदा सुव्यस्थेची घडी बिघडली की, पोलिसांना जबाबदार धरण्यात येते; परंतु ही तेढ निर्माण करणाऱ्यांना कोणीही जाब विचारत नाही.