शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

रसवंती गृहचालकांना मारहाण

By admin | Updated: March 22, 2017 03:35 IST

गंज पेठेतील रसवंती गृहचालकाने हप्ता न दिल्याच्या कारणास्तव सराईत गुंडांनी पती-पत्नीला जबर मारहाण केल्याचा प्रकार

पुणे : गंज पेठेतील रसवंती गृहचालकाने हप्ता न दिल्याच्या कारणास्तव सराईत गुंडांनी पती-पत्नीला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गंज पेठेतील मासे आळी परिसरात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.बालाजी उर्फ बबलू रामदास भंडारी (वय ३०), गोविंद सुभाष अजिले (वय २५) व मयूर नरेंद्र कोमपेल्ले (वय २२, रा. सर्व गंज पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या सराइतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे गंज पेठेतील मासे आळीमध्ये कानिफनाथ नावाचे रसवंती गृह आहे. जानेवारी २०१६ पासून येथे रसवंतीगृह चालवतात. आरोपींनी फिर्यादीकडे येथे व्यवसाय करायचा असल्यास महिना दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत दमदाटी करून वेळोवेळी एकूण ८ हजार रुपये घेतले. दरम्यान, गेल्या काही महिन्यातले पैसे फिर्यादींनी दिले नव्हते. तसेच, यावर्षाचा हप्ताही दिला नव्हता. तो हप्ता मागण्यासाठी आरोपी सोमवारी दुपारी दुकानात आले. पण हप्ता देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर चिडलेल्या सराईत गुन्हेगारांनी लाकडी बॅटने पती-पत्नीला मारहाण केली. त्यानंतर रात्री खडक पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. दरम्यान, आरोपी बालाजी उर्फ बबलू व गोविंद अजिले हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तर, आरोपी मयूर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)