शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

म्हशींचा रॅम्पवॉक, ‘कमांडो रेडा’ आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:33 AM

कृषिक प्रदर्शन : काश्मीर, राजस्थान, लक्षद्वीपच्या शेतकऱ्यांना भुरळ

बारामती : कृषी विकास प्रतिष्ठानच्या कृषिविज्ञान केंद्राच्या मार्फत प्रत्यक्ष ११० एकरांवर प्रयोग केलेले कृषिक कृषी व पशुपक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी काश्मीर, राजस्थान, लक्षद्वीपच्या शेतकºयांनी भेट दिली.या शेतकºयांसह नेपाळ, श्रीलंकेचे बँक अधिकाºयांनी प्रदर्शनाला भेट दिली. आधुनिक शेतीविषयीचे प्रयोग यावेळी जाणुन घेतले.

म्हशींचा रॅम्पवॉक,१६०० किलो वजनाचा रेडा पाहण्यासाठी, त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी शेतकºयांची झुंबड उडाली. ‘कमांडो रेडा’ ठरले आकर्षणया प्रदर्शनात सौरऊर्जेसह कमी पाण्यावर शेती, कमी खर्चाची शेती, फळबाग लागवड, लाकडाचे घर यांसह दुग्ध-उत्पादन, फळप्रक्रिया, कृषी पर्यटन आदींच्या प्रात्यक्षिके शेतकºयांच्या चर्चेचा विषय ठरली.

नारळाच्या भुश्यावर स्ट्रॉबेरी, काकडी, मिरची, टोमॅटो, वांगी अशी केलेली भाजीपाला लागवड चर्चेचा विषय ठरली. केवळ नारळाच्या करवंट्यावरील सालींवर आर्चिडसारखी फुलेलेली फुलशेती देखील आकर्षण ठरले. जिरायती भागातील कांदा, मक्यापासून ते स्ट्रॉबेरीपर्यंत सारीच पिके वेगळ्या तंत्राच्या माध्यमातून घेण्याचे धडे शेतकºयांनी गिरविले.

यावेळी अनेक शेतकºयांनी कृषि विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांच्याशी शेतीप्रयोंगाच्या पाहणीनंतर संवाद साधुन नाविन्यपुर्ण, आधुनिक शेतीप्रयोग प्रथमच पाहिल्याचे सांगितले.पॉलिहाउस प्रमाणे वेगळे तंत्र वापरलेल्या शेडनेट मध्ये केलेला कमी खर्चात ऊत्तम भाजीपाला प्रयोग शेतकºयांनी अभ्यासला. शेतकºयांसाठी आयआयटी मुंबई संशोधित केलेले पाणी धरून ठेवणारी हायड्रोजलसारखी साधने प्रदर्शनात आहेत.

...१६०० किलोच्या ‘कमांडो’ बरोबर सेल्फीसाठी गर्दी४पशु पक्षी प्रदर्शनात खिलार, गीर, सहिवाल, थारपारकर, देवनी, लालकंदारी या देशी गोवंशाच्या जनावरे पाहण्यासाठी गर्दी यंदाही होती.मात्र, यावेळी म्हशींसह १६०० किलो वजनाच्या पुणे येथील मुºहा जातीच्या ‘कमांडो’ या रेड्याने केलेला डीस्को डीजेच्या तालावरील रॅम्पवॉक अनेकांनी प्रथमच अनुभवला. यावेळी अनेकांनी जल्लोष करताना ताल देखील धरला. तर मुख्य आकर्षण ठरलेल्या कमांडो बरोबर सेल्फी काढण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.यावेळी लासा अ‍ॅप्सो,रॉटवेलर,कारवान,कॉकर स्पॅनिनल,लॅ ब्राडोर,डॉबरमॅन आदी जातींचे श्वानासह सात फुटी शिंगाची पंढरपुरी म्हैस शेतकºयांच्या कौतुकाचे विषय ठरले.खानदेशी मांडे,दही चटणी, हूरड्याचे थालीपीठ४भीमथडी यात्रेतील खाऊगल्लीत खानदेशी मांडे, दही चटणी, हूरड्याचे थालीपीठ, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, कांदाभजी,हरीयाणा जिलेबी, मटकी ठेचा, ताक मसाला, बाजरीची भाकरी, हुरडा, गुळपट्टी, पिठले भाकरी, मलईचे आईस्क्रीम आदी खाद्य पदार्थ खवय्यांचे आकर्षण ठरले. बचत गटांनी सर्व पदार्थ बनविले होते.