शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Rashmi Shulka | रश्मी शुक्लांनी 'फोन टॅपिंग'साठी घेतली नव्हती शासनाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 10:51 IST

पुणे : अंमली पदार्थाच्या टोळीचे रॅकेट उघडकीस आणण्याचे कारण सांगून परवानगी न घेताच तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ...

पुणे : अंमली पदार्थाच्या टोळीचे रॅकेट उघडकीस आणण्याचे कारण सांगून परवानगी न घेताच तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांनी ग्राहक अर्ज आवेदन पत्र अपर मुख्य सचिव गृह यांच्यासमोर प्रस्तूत केलेले नाही. अन्यथा अभिवेक्षणाची (phone tapping) परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यास कोणाचा मोबाईल क्रमांक अभिवेक्षणाकरीता मागविण्यात आला आहे, याची कल्पना आली असती. तसेच माेबाईल वापरकत्यांची नावे सुद्धा अभिवेक्षणाची व फेर अभिवेक्षणाची मंजुरी घेताना सादर केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे पोलीस आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन खासदार नाना पटोले, संजय काकडे, आमदार बच्चु कडु, आशिष देशमुख यांचे मोबाईल नंबर अनिष्ट राजकीय हेतूने जाणीवपूर्वक फसवणूक करुन अभिवेक्षणाखाली घेतले आणि हेतू पुरस्पर अभिवेशन चालू ठेवले होते. त्यामुळे रश्मी शुक्ला व इतरांविरुद्ध भारतीय तार अधिनियम कलम २६ प्रमाणे बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे शहर आणि नागपूर शहर यांच्याकडील अभिवेक्षणाचे प्रस्ताव हे राज्य गुप्त वार्ता आयुक्तांमार्फत न पाठविता परस्पर अपर मुख्य सचिव गृह यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविले जातात.पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समितीने २०१५ ते २०१९ या कालावधीतील सर्व पोलीस आयुक्तालयातील फोन टॅपिंगची पडताळणी केली. त्यात पुणे पोलीस आयुक्तालयात २०१७ ते २०१८ या कालावधीत ४ लोकप्रतिनिधींचे ६ मोबाईल टॅपिंग करण्यात आल्याचे आढळून आले.

नाना पटोले, बच्चु कडु व आशिष देशमुख हे अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीत गुंतलेल्या व्यक्ती असल्याचे नमूद करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विक्री करीत असल्याचे कारण सांगून फोन टॅपिंग केले. तर संजय काकडे हे कुख्यात गुंड बापू नायर टोळीचा सदस्य असल्याचे दाखवून ते अनाधिकाराने जमीन बळकाविणे, खंडणी, दरोडा असे गुन्हे संघटितपणे करीत असल्याचे म्हटले होते.

तत्कालीन खासदार नाना पटोले आणि आमदार बच्चु कडु यांचे १८ ऑगस्ट २०१७ ते १४ नोव्हेंबर २०१७ दरम्यान टॅपिंग केला. खासदार संजय काकडे यांचे दोन फोन आणि आमदार आशिष देशमुख यांचा फोन १३ नोव्हेबर २०१७ ते ९ जानेवारी २०१८ या कालावधीत टॅपिंग केले.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात संबंधितांची अगोदर चौकशी करण्यात येईल. या चौकशीतून ज्या बाबी समोर येतील. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल.-अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRashmi Shuklaरश्मी शुक्लाMaharashtraमहाराष्ट्र