शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक शिमला परिषदेचे दुर्मिळ फुटेज एनएफएआयच्या खजिन्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 21:40 IST

देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी हा अमूल्य ठेवा उपलब्ध होणे ही भारतवासियांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.

पुणे : देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या दुर्मिळ चित्रणाची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात भर पडली आहे. देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी हा अमूल्य ठेवा उपलब्ध होणे ही भारतवासियांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे. १९४५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक शिमला परिषदेचे हे बारा मिनिटांचे दुर्मिळ चित्रीकरण असून, रॉयल इंडिया नेव्हल ऑफिसर विल्यम ग्लेडहिल टेलर यांनी ८ एमएम या रिळप्रकारात केलेले हे चित्रण विल्यम टेलर यांची कन्या मागार्रेट साऊथ यांनी संग्रहालयाला जतनासाठी दिले आहे.  

 परिषदेसाठी जमलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालचारी, महम्मद अली जिन्ना, राजेंद्र प्रसाद, भुलाभाई देसाई, मास्टर तारा सिंग, जी बी पंत असे अनेक दिग्गज नेते या चित्रणामध्ये दिसत आहेत. मागार्रेट साऊथ यांनी हे रिळ उदात्त भावनेने संग्रहालयाला दिल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या रिळमुळे संग्रहालयात महत्त्वाची भर पडली असल्याचे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी बुधवारी सांगितले. टेलर यांनी ब्रिटिश इंडिया कंपनीमध्ये वयाच्या १७ व्या वर्षी १९३९ मध्ये प्रवेश केला. महायुद्धानंतर ते नौदलात दाखल झाले. टेलर उत्कृष्ट छायाचित्रकार होते. त्यांच्याकडे ८ एमएमचा कॅमेरा होता. टेलर या सर्व दिग्गज नेत्यांची छबी टिपण्यात यशस्वी ठरले. ऐतिहासिक सिमला परिषद २५ जून ते १४ जुलै १९४५ दरम्यान शिमला येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या आधी लॉर्ड वेव्हलला भेटलेले महात्मा गांधी बैठकीनंतर परत जाताना या चित्रीकरणात दिसत आहेत. शिमला टेलर यांचे आवडते ठिकाण होते. २०१० मध्ये त्यांचे निधन झाले. भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या क्षणांचे जतन व्हावे, असे मागार्रेट साऊथ यांनी संग्रहालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, कोणाकडे दुर्मिळ साहित्य असेल तर संग्रहालयाकडे जतनासाठी द्यावे, असे आवाहन मगदूम यांनी केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPrakash Magdumप्रकाश मगदूमcinemaसिनेमा