आई-वडिलांसह घरात झोपलेल्या चिमुकलीवर बलात्कार करून बालिकेचा खून करणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 06:22 IST2017-10-25T06:22:35+5:302017-10-25T06:22:38+5:30
पुणे : आई-वडिलांसह घरात झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केल्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून करणा-या आरोपीला पोलिसांनी सातारा येथून अटक केली.

आई-वडिलांसह घरात झोपलेल्या चिमुकलीवर बलात्कार करून बालिकेचा खून करणा-यास अटक
पुणे : आई-वडिलांसह घरात झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केल्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून करणा-या आरोपीला पोलिसांनी सातारा येथून अटक केली.
अजय ऊर्फ बबलू रामेश्वर चौरे (वय २३, रा. धायरी गाव, मूळ रा. उस्मानाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. श्रुती विजय शिवगणे (वय अडीच वर्षे) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे. तिचे वडील विजय शिवराज शिवगणे (वय ३२, रा. लगडमळा, वडगाव धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. तपासादरम्यान, आरोपीबाबत माहिती मिळाल्यावर
पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला दहीवडी तालुक्यातील पारगाव (जि. सातारा) येथून ताब्यात घेतले.