आत्महत्या करण्याची धमकी देत पुण्यातील सहकारनगरमध्ये तरुणीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 18:43 IST2018-02-10T18:43:32+5:302018-02-10T18:43:56+5:30
आत्महत्या करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका वाहन चालका विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल देवकर (रा. तळजाई वसाहत) असे आरोपीचे नाव आहे.

आत्महत्या करण्याची धमकी देत पुण्यातील सहकारनगरमध्ये तरुणीवर बलात्कार
पुणे : आत्महत्या करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका वाहन चालका विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल देवकर (रा. तळजाई वसाहत) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी एका २५ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी ही शनिवार पेठेतील एका दुकानात कॉम्प्युटर अॅडमीन म्हणून काम करते. आरोपी त्या दुकानाच्या मालकाच्या वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्यावेळी दोघांची एकमेकांशी ओळख झाली. या ओळखीतून त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणीला आरोपीचा विवाह झाल्याचे समजल्यावर तिने त्याच्याशी संबंध ठेवणे टाळले होते. मात्र आरोपीने शारीरिक संबंध ठेवले नाही तर आत्महत्या करीन, माझ्या बायकोला ठार करेन आणि तुझी बदनामीही करेल अशी धमकी त्याने दिली होती. याप्रकारची धमकी देऊन तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्याने पीडितेवर नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान अत्याचार केला.
पोलीस उपनिरीक्षक के. बी. जाधव या प्रकरणी तपास करीत आहेत.