कचरावेचक मूकबधिर मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: July 1, 2017 07:55 IST2017-07-01T07:55:09+5:302017-07-01T07:55:09+5:30

कचरावेचक मूकबधिर मुलीवर पैशाच्या आमिषाने वारंवार बलात्कार करून तिला गरोदर राहण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना कोथरूड

Rape of a trashy Munkbird girl | कचरावेचक मूकबधिर मुलीवर बलात्कार

कचरावेचक मूकबधिर मुलीवर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कचरावेचक मूकबधिर मुलीवर पैशाच्या आमिषाने वारंवार बलात्कार करून तिला गरोदर राहण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना कोथरूड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पीडित मुलीचे आईवडील अंध आणि भाऊही मूकबधिर आहे.
सहारुल इस्लाम अब्दुल वाहीद लष्कर ऊर्फ शाहरुख (वय २६, रा. आदर्श चौक, केळेवाडी, कोथरूड) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा आसाममधील सिलचर जिल्ह्यातील पालगट दलाईखाना येथील रहिवासी आहे. त्याचे लग्न झालेले असून गेल्या चार वर्षांपासून तो पुण्यामध्ये राहण्यास होता.
पीडित मुलगी १६ वर्षांची असून केळेवाडी परिसरात राहणारी आहे. तिचे कोथरूडमधील मूकबधिर विद्यालयात सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे.
आरोपीचे लग्न झाले असून, त्याची पत्नी गरोदर आहे. ही मुलगी कचरा वेचायला जात असताना आरोपीने तिला गाठले. तिच्याशी लगट करीत तिला पैशाचे आमिष दाखवले. तिला कोथरूड भागातील वारंवार बलात्कार केला. हा प्रकार मार्च महिन्याच्या आधी घडला होता.

Web Title: Rape of a trashy Munkbird girl