शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्टेशन येथे झोपलेल्या मुलीवर बलात्कार; नराधमाला १० वर्षाची सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 16:41 IST

रेल्वेस्टेशनवर झोपलेल्या मुलीला शौचालयात नेत बलात्कार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली

पुणे : रेल्वेस्टेशनवर झोपलेल्या मुलीला शौचालयात नेत बलात्कार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी हा आदेश दिला. दंड न भरल्यास त्याला सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

स्वप्नील रवींद्र खोबे (वय ३०, रा. चिंचवड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. विलास पटारे यांनी काम पाहिले. महिला पोलीस उपनिरीक्षक एम.एस. कवटीकवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. ४ जून २०१९ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडिता बिहारची आहे. ती रेल्वेस्टेशनवर झोपली होती. त्यावेळी "तुझा फोन कुठे आहे' म्हणत त्याने तिला उठविले. फोन सापडला नाही. त्याने तिच्या भाभी आणि भावाच्या फोनवर फोन करून तिला घरी घेऊन जातो आणि चांगले सांभाळतो, असे सांगितले. मात्र, भावाने तिला पोलीस स्टेशनला सोडायला सांगितले. मात्र, त्याने रेल्वे यार्डात दोन रेल्वे गाड्यांच्या शौचालयात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराच्या वेळी ती ओरडायला लागली असता, तिला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड आणि मारहाण (कलम ३२३) नुसार १ वर्षे कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकWomenमहिलाsexual harassmentलैंगिक छळ