अल्पवयीन मुलीवर बळजबरी : तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST2021-05-22T04:10:48+5:302021-05-22T04:10:48+5:30

चेतन वसंतराव कोटमाळे (वय २७, रा .स. नंबर १०८/५, काटेनगर कॉलनी नंबर ३/२४, वाडी, आळंदी रोड) असे गुन्हा दाखल ...

Rape of a minor girl: Crime filed against a youth | अल्पवयीन मुलीवर बळजबरी : तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर बळजबरी : तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

चेतन वसंतराव कोटमाळे (वय २७, रा .स. नंबर १०८/५, काटेनगर कॉलनी नंबर ३/२४, वाडी, आळंदी रोड) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी (वय १५) मुलगी तिच्या आईबरोबर मामाकडे राहते. गेले २ ते ३ महिन्यांपासून ती जेवण व्यवस्थित करत नसल्याने तिच्या मामीने त्याबाबत तिला विचारणा केली त्यावेळी तिने काहीच सांगितले नाही. तिचे दात दुखत असल्याने ती जेवत नसेल असा समज केल्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटत असल्याने तिला १५ मे रोजी दवाखान्यात नेण्यात आले त्यावेळी तिचा सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी ती साडेपाच महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर आई व मामीने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा तिने चेतनचे नाव सांगितले. बदनामी करेन अशी धमकी देत बळजबरी केल्याचे सांगितले.

याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Rape of a minor girl: Crime filed against a youth