शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमच्या औरंगाबादमधील नगरसेविकेवर निलंबित नगरसेवकाकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 18:06 IST

ओळखीचा गैरफायदा घेऊन पिस्तुलाचा धाक दाखवून खराबवाडी (ता. खेड) येथील सारा सिटीमधून एका महिलेस खंडाळा येथील वाॅटर पार्कमध्ये नेऊन विनयभंग केला. तर बारामती, औरंगाबाद या ठिकाणी गुंगीचे औषध देऊन वेळाेवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे.

चाकण : ओळखीचा गैरफायदा घेऊन पिस्तुलाचा धाक दाखवून खराबवाडी (ता. खेड) येथील सारा सिटीमधून एका महिलेस खंडाळा येथील वाॅटर पार्कमध्ये नेऊन विनयभंग केला. तर बारामती, औरंगाबाद या ठिकाणी गुंगीचे औषध देऊन वेळाेवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. याप्रकरणी एमआयएमचा निलंबित नगरसेवक मतीन रशीद सय्यद ( रा. टाऊन हॉल, आसफिया कॉलनी, जयभीम नगर, औरंगाबाद ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मतीनचा भाऊ आणि मेहुणा यांनी पीडित महिलेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी तिघांवर चाकण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आणि मतीन हे 2015 साली औरंगाबाद महापालिकेमधून एकाच पक्षातून निवडून आले हाेते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित नगरसेवक मतीन आणि फिर्यादी महिला हे दोघे ओळखीचे आहेत. २७ वर्षीय पीडित महिलेला मतीनने तुमची आई आजारी आहे असं सांगून पीडित महिलेसह दोन मुलांना मोटारीत बसवून खंडाळा येथील वॉटर पार्क येथे घेऊन गेला. हि घटना दि. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी साडेनऊ ते २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खंडाळा येथील वॉटर पार्क, कृष्णानगर रेसिडेन्सी बारामती, टाऊन हॉल औरंगाबाद, गिरीजा हॉटेल लॉज शरणापूर फाट्याजवळ औरंगाबाद, औरंगाबाद हर्सूल येथील एका घरात वेळोवेळी घडली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मतीन रशीद सय्यद ( रा. टाऊन हॉल, आसफिया कॉलनी, जयभीम नगर, औरंगाबाद ), हामेद सिद्धकी ( रा. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद - मतीनचा मेव्हुणा ) व मोहसीन रशीद सय्यद ( रा. टाऊन हॉल, औरंगाबाद - मतीनचा भाऊ ) या तीन जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक शिंदे मॅडम पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेChakanचाकणRapeबलात्कार