शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

इंटरनेटमुळे बलात्काराचे होतेय बाजारीकरण : डॉ. नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 13:20 IST

इंटरनेटवर बलात्कार या शब्दाचा शोध घेतला की त्याविषयीचे चित्रपट, व्हिडिओ दिसू लागतात. त्यामधून बलात्कार कसे झाले हे दाखवले जाते...

ठळक मुद्दे‘शेवटाचा आरंभ’ पुस्तकाचे प्रकाशन समारंभसेक्स विषयीचे गैरसमज दूर करणे पुरुषांचा सेक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन परिपक्व करणे गरजेचे

पुणे :  इंटरनेटवरबलात्कार या शब्दाचा शोध घेतला की त्याविषयीचे चित्रपट, व्हिडिओ दिसू लागतात. त्यामधून बलात्कार कसे झाले हे दाखवले जाते. बलात्कार ही फारच गंभीर घटना आहे. इंटरनेटवर हे दाखवणे बंद केले पाहिजे यामुळे त्याचे बाजारीकरण होत आहे, असे मत शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य  परिषदेत आयोजित ज्योती पुजारी लिखित ‘शेवटाचा आरंभ’ या  पुस्तकाचे प्रकाशन गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून ज्येष्ठ लेखिका डॉ. अंजली सोमण, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. मंदा खांडगे, विद्या बुक्स प्रकाशनाचे शशिकांत पिंपळापुरे उपस्थित होते. गोऱ्हे म्हणाल्या, समाजात बलात्कार म्हटलं की, अरे बापरे ही प्रतिक्रिया येते. आम्ही कोपर्डी प्रकरण, निर्भया प्रकरण, ज्योती चौधरी घटना यांचा मागोवा घेतला. कोर्टातले डावपेच व न्याय प्रवास यांची ओळख पण आम्हाला झाली. या घटना ताज्या असेपर्यंत आंदोलने-मोर्चे निघतात. मात्र, घटना जुनी झाली की, त्याची तीव्रताही कमी होते. मात्र यात यातना सहन कराव्या लागतात त्या पिडीत स्त्रीला. पण बलात्कार म्हणजे शेवट नव्हे. या शेवटातुनच एक नवा आरंभ होत असतो.डॉ. अंजली सोमण म्हणाल्या, समाजात स्वत:त गुंतलेले अनेक साहित्यिक असतात. मात्र काही लेखक सामाजिक भान जपत समाजातील विकृत घटनांवर लेखन करून प्रश्न मांडत आहेत. समाजात सेक्स विषयीचे अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करणे आणि पुरुषांचा सेक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन परिपक्व करणे गरजेचे झाले आहे. डॉ. मंदा खांडगे म्हणाल्या, मागील अनेक वर्षात बलात्काराचे प्रश्न विविध सामाजिक संस्था मांडत आहेत. बलात्कार ही मानसिक विकृती असल्याने त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी विविध संघटनांनी एकत्र यायला हवे. पीडित महिलेला वेगळ्या नजरेनी न पाहता तिला मानसिक धैर्य द्यायला हवे. तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची तीव्रता असेपर्यंतच आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे. लेखिका ज्योती पूजारी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शशिकांत पिंपळापुरे यांनी केले. चंचल काळे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेRapeबलात्कारInternetइंटरनेटSocial Mediaसोशल मीडिया