मुटकेवाडीत मित्राच्या पत्नीवर बलात्कार

By Admin | Updated: May 4, 2017 02:13 IST2017-05-04T02:13:37+5:302017-05-04T02:13:37+5:30

घरात कोणी नसल्याची संधी साधत घरात घुसून मित्राच्या पत्नीवर शिवीगाळ, दमदाटी करत व जिवे मारण्याची

Rape of a friend's wife in Mutkevadi | मुटकेवाडीत मित्राच्या पत्नीवर बलात्कार

मुटकेवाडीत मित्राच्या पत्नीवर बलात्कार

महाळुंगे : घरात कोणी नसल्याची संधी साधत घरात घुसून मित्राच्या पत्नीवर शिवीगाळ, दमदाटी करत व जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा प्रकार मुटकेवाडी (ता. खेड) येथे घडला. याप्रकरणी जळगावच्या तीसवर्षीय नराधमास रात्री उशिरा अटक करण्यात आल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.
सचिन सुखदेव पाटील (वय ३०, सध्या रा. मुटकेवाडी, ता. खेड, मूळ रा. शिरपूर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय पीडित विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस ठाण्याचे अंमलदार संजय घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पीडित महिलेच्या पतीचा मित्र असून तिच्याही ओळखीचा होता. त्याचे नेहमी तिच्या घरी जाणे-येणे होते. रात्री साडेआठ वाजण्याच्यादरम्यान घरात कोणी नसल्याची संधी साधून तो तिच्या घरात घुसला. शिवीगाळ, दमदाटी करत व जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.

Web Title: Rape of a friend's wife in Mutkevadi