शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

10 लाखांची खंडणी मागितली, माहिती अधिकार कार्यकर्त्यासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 18:29 IST

खंडणीची रक्कम शिवाजीनगर येथील हॉटेल गंधर्वमध्ये शनिवारी (दि.1) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास स्वीकारताना पोलिसांनी त्यांना अटक केली.

पुणे : माहिती अधिकाराचा वापर करुन 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यासह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आशुतोष अरुण घोलप (वय 45, रा़ सिद्धीविनायक सोसायटी, भुसारी कॉलनी, कोथरुड) आणि माहिती अधिकार कार्यकर्ता रामचंद्र ज्ञानोबा फुगे (वय 65, रा़ शनि मंदिराजवळ, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी 20 लाखांच्या खंडणीची मागणी करुन 10 लाख रुपये खंडणी घेतली होती. 

खंडणीची रक्कम शिवाजीनगर येथील हॉटेल गंधर्वमध्ये शनिवारी (दि.1) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास स्वीकारताना पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकणी प्रशांत अजित अगरवाल (वय 31, रा. खडकी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल यांचा वर्धमान असोसिएटस ही बांधकाम कंपनी आहे़ त्यांनी बिल्डींगचे प्लॅन महापालिका कार्यालयात सादर केले होते. या बिल्डींग प्लॅनची माहिती रामचंद्र फुगे यांनी माहिती अधिकारात मागवून घेतली. त्यावर त्यांनी तक्रार केली होती. अगरवाल यांना तुमचे बांधकाम अनधिकृत असून ही तक्रार मागे घ्यायची असेल तर 20 लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी केली. त्यानंतर अगरवाल यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. अगरवाल यांनी त्यांना इतके पैसे देणे शक्य नाही, असे सांगून तडजोडीमध्ये 10 लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पैसे घेण्यासाठी त्यांना शनिवारी रात्री पावणे आठ वाजता शिवाजीनगर येथील हॉटेल गंर्धव येथे बोलाविले. अगरवाल यांनी 2 हजार रुपयांच्या 5 नोटा वर ठेवून त्याखाली त्याच आकाराचे आतमध्ये कोरे कागद बंडलच्या स्वरुपात ठेवले व ते पैसे स्वीकारताना पोलिसांनी दोघांना सापळा रचून रंगेहाथ अटक केली. दरम्यान, आरोपींनी अशाप्रकारे कोणाला फसवले असल्यास त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे हे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताArrestअटकPoliceपोलिस