शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला डॉक्टरला बदनामीची धमकी देत २० लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:55 IST

शहरातील नामांकित महिला डॉक्टराला मिटिंगमध्ये धक्काबुक्की करुन बदनामी करण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या देशातील नामांकित डॉक्टरांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़. 

ठळक मुद्देदिल्ली, मुंबई, हैद्राबादच्या ५ डॉक्टरांसह ६ जणांविरूध्द गुन्हाही घटना २६ जानेवारी ते २२ मार्च २०१८ दरम्यान  घडली आहे.

पुणे : शहरातील नामांकित महिला डॉक्टराला मिटिंगमध्ये धक्काबुक्की करुन बदनामी करण्याची धमकी देत २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या देशातील नामांकित डॉक्टरांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़. खंडणी मागणाऱ्यांमध्ये पुणे, दिल्ली, मुंबई आणि हैद्राबाद येथील डॉक्टरांचा समावेश आहे़. डॉ. प्रदिप चौबे (वय ६५, रा़ दिल्ली), डॉ. सुरेंद्र उगले (वय ६०, रा़ हैद्राबाद), डॉ. राजेश खुल्लर (वय ५८, रा़ दिल्ली), डॉ. अतुल पिटर (वय ५०, रा़ दिल्ली), डॉ. मुफजल लकडावाला (वय ४७, रा़ मुंबई) आणि श्रीहरी ढोरेपाटील (वय ६५, रा पुणे) यांच्याविरूध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत़. याप्रकरणी पुण्यातील ४७ वर्षांच्या नामांकित महिला डॉक्टरने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २६ जानेवारी ते २२ मार्च २०१८ दरम्यान  घडली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रदिप चौबे, डॉ. सुरेंद्र उगले, डॉ. राजेश खुल्लर, डॉ. अतुल पिटर आणि श्रीहरी ढोरेपाटील यांनी मिटींगमध्ये महिला डॉक्टरांची बदनामी करुन त्यांना धक्काबुक्की केली़. डॉ़. लकडावाला यांनी महिला डॉक्टरला २० लाख रुपये दे नाही तर तुझी बदनामी चालू ठेवू अशी धमकी दिली़. तसेच डॉ़ ढोरेपाटील यांनी मनास लज्जा उत्पन्न होईल अशी बोलले़.     डॉ. चौबे हे दिल्ली येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत असुन ते लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत.  डॉ. उगले हे हैद्राबाद येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत़. डॉ. खुल्लर हे देखील एमए जनरल सर्जन आहेत. डॉ. पीटर हे डीएनबी तर डॉ. लकडावाला एमएस जनरल सर्जन तसेच बॅरॅट्रीक सर्जन आहेत. गुन्हा दाखल झालेले पाचही डॉक्टर देशातील नामांकित डॉक्टर आहेत. श्रीहरी ढोरेपाटील हे पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत़. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते अधिक तपास करीत आहेत़.

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरCrimeगुन्हाPoliceपोलिस