रणजितसिंह डिसले यांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारामुळे भारताची मान जगाच्या पाठीवर उंचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:21+5:302020-12-05T04:16:21+5:30

इंदापूर : भारताला पहिल्यादाच हा सन्मान मिळाला असून जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून डिसले सरांचा गौरव होणे ही नक्कीच माझ्यासहीत ...

Ranjit Singh Disley's Global Teacher Award has raised India's profile in the world | रणजितसिंह डिसले यांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारामुळे भारताची मान जगाच्या पाठीवर उंचावली

रणजितसिंह डिसले यांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारामुळे भारताची मान जगाच्या पाठीवर उंचावली

इंदापूर : भारताला पहिल्यादाच हा सन्मान मिळाला असून जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून डिसले सरांचा गौरव होणे ही नक्कीच माझ्यासहीत प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणारा आपला शिक्षक जागतिक पातळीवर सन्मानित होतो यापेक्षा अभिमानाची दुसरी गोष्ट नसून डिसले सरांनी यापूढील काळातही आपल्या कार्यकुशलतेने देशाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन देशाची मान उंचवावी त्यांच्या अशा प्रयत्नांच्या कामी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने डिसले सरांच्या पाठीशी सदैवपणे खंबीरपणे उभे राहणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

शुक्रवार रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे जाऊन रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डिसले कुटुंबियांचा व डिसले यांचे आई वडील यांचा सन्मान केला व यासंदर्भात इंदापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली.

भरणे म्हणाले की, खऱ्या अर्थाने डिसले यांनी ज्ञानदानाचे अचुक काम केल्यामुळे ग्लोबल टीचर पुरस्कार मिळणार आहे. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्थरावरील ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळणार असल्याने, भारताची मान जगाच्या पाठीवर उंचावणार ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यातील शिक्षक ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी पात्र ठरतो हे माझे मोठे भाग्य आहे.

--

फोटो क्रमांक : ०४इंदापूर भरणे सत्कार

फोटो ओळ : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे रणजीतसिंह डिसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे करताना मान्यवर

Web Title: Ranjit Singh Disley's Global Teacher Award has raised India's profile in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.