रांजणगावला महागणपतीला आरास
By Admin | Updated: March 29, 2017 00:14 IST2017-03-29T00:14:39+5:302017-03-29T00:14:39+5:30
चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात. याप्रमाणे हिंदू नववर्ष

रांजणगावला महागणपतीला आरास
रांजणगाव गणपती : चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात. याप्रमाणे हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर असंख्य शौकिनांनी दुचाकीपासून चारचाकी व सहाचाकी, पिकअप, टेम्पो, ट्र्रक खरेदी करून आपल्या लाडक्या महागणपती मंदिरासमोर दाखल करून ब्राह्मणांच्या वेदमंत्रोच्चाराने मनोभावे पूजाअर्चा केली.
या वेळी घरातील बालगोपाळांसह महिला, आबालवृद्धही उपस्थित राहून या नवीन वाहन खरेदीच्या आंनदात सहभागी होतात. वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला नवीन खरेदी करणे भाग्याचे समजले जाते. यावरूनच अनेक नागरिक वाहने खरेदी करताना गुढीपाडव्याचा
मुहूर्त साधतात. दिवसभरात सुमारे
२०० ते २५० वाहनांची महागणपती मंदिरासमोर पूजा केल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गुढीपाडवा सणाला श्री महागणपतीला मोगरा फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. श्रींना गाठीचा नैवेद्य दाखवण्यिात आला होता. तर दरवर्षीप्रमाणे विश्वस्त आणि ग्रामस्थांनी घटावरून वर्षभराचे पंचांगवाचन केले असता पाऊसपाणी समाधानकारक असून धनधान्याची भरभराट होईल, असे भाकित वर्तविण्यात आले.