रांजणगाव गणपतीला आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:30+5:302021-05-15T04:09:30+5:30
हिंदू धर्म संस्कृती व रूढी परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैंकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेनिमित्त दरवर्षी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्री ...

रांजणगाव गणपतीला आरास
हिंदू धर्म संस्कृती व रूढी परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैंकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेनिमित्त दरवर्षी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्री महागणपतीला आंब्यांची आरास केली जाते. त्यानुसार यावर्षी श्रींना आंब्यांचा नैवेद्य दाखविण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून श्रींची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू असल्याचे विश्वस्त अँड. विजयराज दरेकर यांनी सांगितले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे तसेच पूजारी मकरंद कुलकर्णी व प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
-----------------------------------------
फोटो क्रमांक : १४ रांजणगाव गणपती
फोटो : रांजणगाव गणपती येथील श्री महागणपतीला आंब्याचा महानैवेद्य दाखविण्यात आला.