दुपारनंतरच मतदानासाठी रांगा

By Admin | Updated: February 22, 2017 03:38 IST2017-02-22T03:38:06+5:302017-02-22T03:38:06+5:30

मतदान जागृतीसाठी झालेले प्रयत्न, सकाळीच मतदान करून घेण्याचे आवाहन केले असले तरी बहुतांश मतदान

Range for voting only after noon | दुपारनंतरच मतदानासाठी रांगा

दुपारनंतरच मतदानासाठी रांगा

पुणे : मतदान जागृतीसाठी झालेले प्रयत्न, सकाळीच मतदान करून घेण्याचे आवाहन केले असले तरी बहुतांश मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
अनेक मतदान केंद्रांवर दुपारी साडेतीन- चार वाजल्यानंतर मतदानासाठी रांगा लागण्यास सुरूवात झाली. त्यातच दोन किंवा तीन मतदारयंत्र असलेल्या ठिकाणी एका मतदाराला मतदानासाठी वेळ लागत होता.
काही ठिकाणी मतदारयादीत नाव सापडत नव्हते. त्यामुळे हा उशिर वाढत गेला. त्यामुळे सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यनंतरही अनेक ठिकाणी रांगा दिसत होत्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाच्या रांगेत असणाऱ्या मतदारांना क्रमांक देण्यात आले. त्यांचे मतदान पूर्ण करून घेण्यासाठी साडेसात ते आठ वाजले होते. सर्वाधिक वेळ मतदान गोखलेनगर, बाणेर प्रभागात सुरू होते.
अनेक ठिकाणी दुपारनंतर कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले़ त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली़

Web Title: Range for voting only after noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.