‘लोकमत’च्या सहयोगाने रंगला रास दांडिया
By Admin | Updated: October 26, 2015 01:37 IST2015-10-26T01:37:14+5:302015-10-26T01:37:14+5:30
रासलिला २०१५ कोरीयंथम क्लब पुणे येथे दांडिया चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तिन हजरांपेक्षा जास्त पुणेरी नागरिकांनी याचा आनंद लुटला

‘लोकमत’च्या सहयोगाने रंगला रास दांडिया
पुणे: रासलिला २०१५ कोरीयंथम क्लब पुणे येथे दांडिया चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तिन हजरांपेक्षा जास्त पुणेरी नागरिकांनी याचा आनंद लुटला. प्राइम नाईन प्रोडक्शन आणि लोकमत युवा नेक्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक वयोगटातील लोकांनी यावेळी दांडीया आणि गरबा खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी उत्कृष्ठ दांडिया खेळणाऱ्या काही जोड्यांना मॅक्स फॅशनचे संजय आणि आस्क मी डॉट कॉम चे सनी चड्डा यांच्यातर्फे पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमामधून जो काही आर्थिक निधी मिळाला तो संपुर्ण गरिब मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या ड्रीम टू लर्न या संस्थेला देण्यात आला.
रॉयल इव्हेन्ट आणि लोकमत युवा नेक्ट्स यांच्या वतीने एरंडवण्यातील डीपी रोडवर असणाऱ्या सृष्टी गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने दांडीया, गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो पुणेकर नवरात्रीची मजा लुटण्यास आले होते.
रॉयल इव्हेन्ट चे कपील फेंगसे, सुमीत बारटक्के, युवराज फेंगसे, चेतन दांगट आणि रणजीत लाड यांनी सिनेकलाकर अमृता खानविलकर आणि भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळणारा पुण्याचा केदार जाधव यांना खास तरूणाईचा उत्साह वाढविण्यासाठी बोलवण्यात आले होते. अनेकांना या दोघांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी उत्कृष्ठ दांडीया खेळणाऱ्या विजयी जोड्यांना हॅलीकॉप्टरची एक सफारी तर एलइडी टिव्ही, आयफोन, टायटन घड्याळ आदी बक्षीसांचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)