शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

बारामतीत रामराजे नाईक - निंबाळकर यांची अजित पवारांशी भेट; अजित दादा म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 14:14 IST

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कोरोना आढावा बैठक पार पडली यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तातडीने निर्णय घ्या- अधिकाऱ्यांना आदेश पाण्याचा फुगवटा कमी करण्यासंदर्भात सध्या उपाययोजना सुरू अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक विसर्ग सुरू

पुणे: महाराष्ट्रातील पाऊस, पूरपरिस्थिती याचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांचा राज्यात दौरा चालू आहे. काल ते पुण्यात कोरोना आणि पावसाचा आढावा घेण्यासाठी आले होते. आज सकाळी बारामतीत त्यांची कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी रामराजे नाईक - निंबाळकर त्यांना भेटले. 

याबाबत अजित दादांना विचारले असता ते म्हणाले. निंबाळकर मला त्यांच्या कामासंदर्भात भेटण्यासाठी आले होते. त्यांचे काम झाले ते निघून गेले. या संदर्भात काही बोलण्यासारखे नाही. सध्या आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देऊ, अशा शब्दात पवार यांनी रामराजे नाईक - निंबाळकर यांच्यावरील प्रश्नास उत्तर देण्यास नकार दिला.   बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कोरोना आढावा बैठक पार पडली यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

आता आपल्या जनतेसमोर पुराचे मोठे संकट आले आहे. त्यावर आपण लक्ष देऊ असे सांगून पवार म्हणाले, कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकमेकांच्या संपर्कात आहेत. तसेच कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री अधिकारी समन्वय राखून पुर परिस्थिती हाताळत आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पाण्याचा फुगवटा असल्यामुळे अजुनही परिस्थिती बिकट आहे. या संकटात अडकलेल्या जनतेला राज्यसरकार सर्वोतपरी सहकार्य करणार आहे,  अशी ग्वाही त्यांनी दिली.

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तातडीने निर्णय घ्या 

दरडी कोसळून आणि भू सख्कलनामुळे दुर्दैवाने काही मृत्यू झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध खात्याचे मंत्री पुरग्रस्त भागात फिरत आहेत. मी देखील आज सातारा तर उद्या सांगली आणि कोल्हापूर भागाचा दौरा करणार आहे. या भागातील जनतेसाठी तातडीने शिवभोजन थाळी मोफत सुरू करण्यात आली आहे. धान्यामध्ये तांदुळ , डाळ व अन्न शिजवण्यासाठी रॉकेल तसेच फुड पॅकेट, पाण्याच्या बाटल्या पोहचवण्यात येत आहे.  जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

पाण्याचा फुगवटा कमी करण्यासंदर्भात सध्या उपाययोजना सुरू 

आतापर्यंत १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या भागातील पालकमंत्री, विभागिय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे. अजुन काही मदत तसेच उपाययोजना करण्यासंदर्भात बैठका होणार आहेत. पाण्याचा फुगवटा कमी करण्यासंदर्भात सध्या उपाययोजना सुरू आहेत. अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर नद्यांमधून पाऊने तीन लाख क्युसेक पाणी अलमट्टीमध्ये जात आहे. नौदल, वायुदल तसेच सैन्यदल, एनडीआरएफ, एसटीआरएफ बचाव तुकड्या मदतीसाठी आलेल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरcorona virusकोरोना वायरस बातम्याRainपाऊसBaramatiबारामती