गणोशभक्तांची सुरक्षा रामभरोसे
By Admin | Updated: September 3, 2014 23:49 IST2014-09-03T23:49:32+5:302014-09-03T23:49:32+5:30
खेडच्या पूर्व भागात गणोश विसर्जनाच्या ठिकाणी प्रशासनाने खबरदारी म्हणून कुठलीही उपाययोजना आखलेली नाही.

गणोशभक्तांची सुरक्षा रामभरोसे
शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व भागात गणोश विसर्जनाच्या ठिकाणी प्रशासनाने खबरदारी म्हणून कुठलीही उपाययोजना आखलेली नाही. त्यामुळे भीमा-भामा नदीवर ‘श्रीं’ना भावपूर्ण निरोप देणा:या सर्व गणोशभक्तांची सुरक्षा रामभरोसे आहे.
खेडच्या पूर्व भागातील गावांमध्ये गणोशोत्सवाची धूम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. हा उत्सव चैतन्यपूर्ण वातावरणात सांगतेकडे वाटचाल करीत आहे. या वर्षी या भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत गणोश मंडळांमध्ये वाढ झाली आहे.
या पाश्र्वभूमीवर, प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवणो अत्यंत गरजेचे आहे. शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे भीमा व भामा या दोन नद्यांचा संगम होऊन ती भीमा-भामा या नावाने दक्षिण वाहिनी म्हणून पुढे प्रवाहित होते. या संगमाच्या शेजारी गणपती विसर्जनाचे ठिकाण आहे. पूर्व भागातील बहुतांशी मोठमोठी सार्वजनिक गणोश मंडळे याच पवित्र ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यास पसंती देत असतात. चालू वर्षी अनेक ठिकाणी लहान मुलांनीही बालगणरायाची स्थापना केलेली आहे. येत्या सोमवारी (दि. 8) शेलपिंपळगाव येथील भीमा-भामा तीरावर सर्वच गणोश मंडळांच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये हजारो भाविक-भक्त सहभागी झालेले असतात.
यंदा मुबलक होत असलेल्या पावसाने भीमा-भामा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग आहे. या पाश्र्वभूमीवर, गणोश विसर्जनाच्या वेळी या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
भीमा-भामा नदीवर बाल गणोशभक्तांची संख्या मोठी
खेडच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव, शेलगाव, दौंडकरवाडी, वडगाव-घेनंद, कोयाळी-भानोबाची, मोहितेवाडी, नवीनगाव, दत्तवाडी आदी गावांच्या सार्वजनिक गणोश मंडळांच्या बाप्पाचे विसर्जन भीमा-भामा तीरावर केले जाते. तसेच, बाहेरील गावातील, विद्यालयातील व घरगुती बाप्पालाही याच ठिकाणाहून निरोप दिला जातो. गणोश विसर्जनाला बालगणोशभक्तांची मोठी गर्दी असते. याचा विचार करता, सुरक्षा असणो अत्यंत आवश्यक आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गणपती विसर्जनासाठी प्रशासनातर्फे चोख सुरक्षाव्यवस्था ठेवणो आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणच्या विसर्जन घाटावर कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी बालगणोशभक्तांसह ज्येष्ठांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. याविषयी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील विसर्जन घाटांवरील तयारीचा घेतलेला हा आढावा.