डोंगरगावच्या सरपंचपदी रजनी कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST2021-02-11T04:13:30+5:302021-02-11T04:13:30+5:30

निवडणूक निर्णय अधिकारी वाय. डी. कारंडे यांनी निवडी जाहीर केला. त्यांना ग्रामसेवक अतुल कोहीनकर, कामगार तलाठी अशोक शिंदे यांनी ...

Rajni Kamble as Sarpanch of Dongargaon | डोंगरगावच्या सरपंचपदी रजनी कांबळे

डोंगरगावच्या सरपंचपदी रजनी कांबळे

निवडणूक निर्णय अधिकारी वाय. डी. कारंडे यांनी निवडी जाहीर केला. त्यांना ग्रामसेवक अतुल कोहीनकर, कामगार तलाठी अशोक शिंदे यांनी सहकार्य केले.

९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत श्री डोंगरगाव ग्रामविकास परिवर्तन पॅनलने नऊपैकी आठ जागा जिंकून बहुमत मिळविले.

विरोधी श्री काळभैरवनाथ पॅनलला एक जागा मिळाली.

निवडीवेळी अनिल गायकवाड, सोमनाथ गायकवाड, सच्चिदानंद वाघमारे, वैशाली शिंदे, प्रियांका गायकवाड, संध्या गडदे, सुजाता गडदे आदी सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

माजी सरपंच बाबासाहेब गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, रमण गायकवाड, नारायण गायकवाड, नामदेव वाघमारे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Rajni Kamble as Sarpanch of Dongargaon