Rajgurunagar Nagar Parishad Election Result 2025: राजगुरुनगर नगरपरिषदेवर एकनाथ शिंदेंची सत्ता; नगराध्यक्षपदी मंगेश गुंडाळ यांची बहुमताने निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:27 IST2025-12-21T13:26:36+5:302025-12-21T13:27:14+5:30
Rajgurunagar Nagar Parishad Election Result 2025 राजगुरूनगर नगरपरिषदेवर शिवसेनेचे १०, राष्ट्रवादी ५, भाजप ४, अपक्ष २ नगरसेवक निवडून आले आहेत

Rajgurunagar Nagar Parishad Election Result 2025: राजगुरुनगर नगरपरिषदेवर एकनाथ शिंदेंची सत्ता; नगराध्यक्षपदी मंगेश गुंडाळ यांची बहुमताने निवड
राजगुरुनगर: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे मंगेश वंसतराव गुंडाळ यांनी बाजी मारली. शिवसेनेचे १०, राष्ट्रवादी ५, भाजप ४, अपक्ष २ नगरसेवक निवडून आले आहेत.
राजगुरुनगर नगर परिषेदेची मतमोजणी तालुका क्रीडा संकुलात दि.२१ डिसेंबर सकाळी १० वाजता सुरु दिड तासात निकाल हाती येऊ लागले. मंगेश गुंडाळ हे प्रत्येक फेरीत आघाडीवर होते. विजयी मंगेश गुंडाळ यांना ७८४८
मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे किरण चंद्रकांत आहेर यांना ५७५० मते मिळाली आहेत. भाजपाचे शिवाजी नंदकुमार मांदळे यांना ३०७० मते मिळाली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बापू किसन थिगळे यांना ९३९ मते मिळाली आहेत. तर अपक्ष इंगवले गणेश लक्ष्मण ५५ मते मिळाली आहेत. नोटा ११८ आहेत.
नगरसेवकपदी सुनंदा थिगळे (अपक्ष), किशोर थिगळे (अपक्ष ), कुमार सांडभोर (भाजपा), राजश्री सांडभोर (शिवसेना) स्नेहल राक्षे (राष्ट्रवादी ), दिनेश सांडभोर (राष्ट्रवादी), राजेंद्र जाधव (भाजप), सिद्धी शेळके (शिवसेना),मनोहर सांडभोर (शिवसेना), ज्योती वाडेकर(शिवसेना), अमोल वाळुंज (शिवसेना), श्वेता ढोले (शिवसेना), कल्पना आढारी (शिवसेना), वैभव घुमटकर(राष्ट्रवादी), सुप्रिया घुमटकर (राष्ट्रवादी), निलेश घुमटकर (भाजपा), आशा गुंडाळ (शिवसेना ),अश्विनी आवटे (शिवसेना फैज मोमिन(भाजपा), मित्रसेन डोंगरे( राष्ट्रवादी ),सुप्रिया पिंगळे (शिवसेना) हे निवडून आले आहेत.