शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पुराणिक यांच्या दादागिरीच्या व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल; पुणे पोलिसांना तपासाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 13:40 IST

महिला आयोगाच्या या भूमिकेमुळे पुराणिक यांच्या संकटात मोठी भर

धायरी : पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल  झाल्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत एका महिलेने केलेल्या तक्रारीवर आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना संबंधित प्रकाराचा कसून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. 

महिला आयोगाच्या या भूमिकेमुळे पुराणिक यांच्या संकटात मोठी भर पडली असून त्यांच्यावर पोलीस खात्याकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. निष्पाप नागरिकांना अमानुष पद्धतीने मारहाण तसेच अत्यंत अर्वाच्च शब्दांत केलेल्या शिवीगाळमुळे पुराणिक हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या दादागिरीविरोधात संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. याचदरम्यान महिला आयोगाने तक्रारीची गंभीर दखल घेऊन तपासाचे निर्देश दिले आहेत.

वादग्रस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी काही लोकांना अत्यंत अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केली. तसेच निष्पाप नागरिकांना बेदम मारहाण केली. या त्यांच्या दादागिरीचा अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ बनवला असल्यामुळे पुराणिक हे कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांच्या दादागिरीचा व्हिडीओ समाजमाध्यमामध्ये प्रसारित झाला आहे. त्याचबरोबर याबाबतीत एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. महिलेची तक्रार प्राप्त झाली असून त्याआधारे आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना तपासाचे निर्देश दिले आहेत, असे ट्विट राज्य महिला आयोगाने केले आहे. पुराणिक यांनी यापु्र्वीही अशाच प्रकारे एका महिलेला बेदम मारहाण केली होती, असे तक्रारदार महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. महिलेच्या या तक्रारीमुळे पुराणिक यांना त्यांची दादागिरी चांगलीच भोवणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRupali Chakankarरुपाली चाकणकरWomenमहिला