अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार राजेंद्र निंबाळकर यांनी स्विकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 20:03 IST2018-03-19T19:59:51+5:302018-03-19T20:03:39+5:30
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (विशेष) या पदाचा कार्यभार राजेंद्र निबांळकर यांनी सोमवारी स्विकारला.

अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार राजेंद्र निंबाळकर यांनी स्विकारला
पुणे : पुणे महानगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (विशेष) या पदाचा कार्यभार राजेंद्र निंबाळकर यांनी सोमवारी स्विकारला. आठ दिवसांपुर्वींच त्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते, मात्र ते महापालिकेला प्राप्त झाले नव्हते. ते मिळाल्यानंतर निंबाळकर यांनी सोमवारी सकाळी कार्यालयात येऊन आपल्या पदाची सुत्रे स्विकारली. याआधी एकदा त्यांनी महापालिकेत जकात विभागाचे उपायुक्त म्हणून जबाबदारी स्विकारली होती.
या पदावर दोन वर्षे कार्यरत असलेल्या प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाली. त्या जागेवर कौत्सुभ दिवेगावकर यांची नियुक्ती झाली होती. मात्र, ते उपस्थित झालेच नाहीत. त्यांची नंतर परस्पर दुसऱ्या ठिकाणी बदली झाली. त्या जागेवर आता निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पुण्यात म्हाडा च्या संचालक पदावरही कार्यरत होते.