शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘राजसाहेब’ पुण्यात आले...पण कार्यकर्त्यांना भेटलेच नाहीत :

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:47 IST

दिवसभर पाहिली निरोपाची वाट : नियुक्तीपत्र नेत्याच्या हातून मिळण्याची होती अपेक्षा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील पक्षसंघटनेमध्ये फेरबदल करण्यात आले असून संघटनात्मक पातळीवर ‘नवचैतन्य’ आणण्यासाठी नवनियुक्त पदाधिका-यांना मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार होते. त्यामुळे कार्यकर्ते उत्साहात होते. परंतु, पुण्यात आलेल्या राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजन पडले.

मनसेच्या शहराध्यक्ष बदलानंतर 45 जणांची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये उपशहर अध्यक्ष, शहर सचिव, शहर संघटक, विभाग अध्यक्ष, विभाग सचिव, कार्यालयीन कामकाज, प्रसार माध्यम सचिवांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. या सर्वांना ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि नेते बाबू वागस्कर यांनी जाहिर केले होते.

त्यामुळे उत्साहात असलेल्या नवनियुक्त पदाधिका-यांनी आपापल्या भागातील तसेच संभाव्य प्रभागातील कोणकोणत्या रस्त्यांवर, कोणकोणत्या चौकात बॅनर लावायचे, राज ठाकरे यांच्यासोबतचे फोटो असलेले होर्डींग उभारायचे, जाहिरात-प्रसिद्धी याचे नियोजन केले होते. काही जणांनी तर  ‘सोशल मिडीया टीम’लाही सज्ज ठेवलेले होते.  शुक्रवारी ठाकरे पुण्यात येणार असल्याने सर्व पदाधिकारी तयारीत होते. पक्षीय पातळीवरुन केव्हाही निरोप येऊ शकतो अशी शक्यता गृहीत धरुन सर्वजण  ‘निरोपा’ची वाट पहात होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साहेबांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचा निरोप सरतेशेवटी मिळाला. त्यामुळे कार्यकर्ते काहीसे नाराज झाल्याचे पहायला मिळाले.----शहरात कोरोनाची रुग्णसंख्या  वाढत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवनियुक्त पदाधिका-यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.  - वसंत मोरे, शहराध्यक्ष, मनसे

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या