शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: राज ठाकरेंचा मंगळवारपासून पुणे दौरा; वसंत मोरेंना भेटीसाठी थेट फोन करून बोलावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 18:34 IST

पुढील आठवड्यात पुण्यात मनसेची सभा होणार

पुणे : राज ठाकरे उद्यापासून पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठका घेणार आहेत. तसेच काही दिवसात राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. याबाबत देखील नियोजन करण्यात येईल अशी चर्चा सुरु आहे. त्यातच मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे वसंत मोरे यांना फोन करून बोलावलं असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

भोंग्याच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. भोंग्याच्या आंदोलनातही मोरे सहभागी नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे विविध चर्चाना उधाण आले. पुण्यात रविवारी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली मनसे कोअर कमिटीच्या पदाधिकार्यांसहित मेळावा आयोजित केला होता. त्या कोअर कमिटीच्या निमंत्रण पत्रिकेत वसंत मोरे यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मला पक्षातून डावललं जातंय असं मोरे म्हणाले होते. उद्या राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी वसंत मोरे यांना फोन करून बोलावलं आहे, या रविवारी झालेल्या मेळाव्यासंदर्भात झालेल्या बैठकीचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.   

पुढील आठवड्यत राज ठाकरेंची सभा 

 पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. २१ ते २८ मे दरम्यान त्यांचा पुणे दौरा होणार आहे. याच कालावधीत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना परवानगीचे पत्र पाठवले आहे.     

हिंदूजननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या पुणे शहरात होणा-या सभेचे आयोजन मे महिन्याच्या २१ ते २८ तारखेच्या दरम्यान पुणे शहर मनसे कडून करण्यात येत आहे. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर ठिकाण सुरक्षिततेच्या दृष्टीकोना तुन तसेच  सभेमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण न होण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या सुचने नुसार सर परशुरामभाऊ महाविदयालय चे मैदान निवडत आहोत. तरी सदर कामी आपण योग्य त्या सुचना संबंधीत यंत्रणा व सर परशुरामभाऊ महाविदयालय प्रशासन यांना दिल्यास आम्हाला सभेचे नियोजन करण्यास सहकार्य होईल तरी सदरबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणSocialसामाजिक